आत्मगिरी विद्यालयाचा १० वी निकाल १००%. स्वरांजली ढोले केंद्रात दुसरी

म्हसवड:- प्रतिनिधी              महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाने एस एस सी बोर्ड परीक्षा २०२६ चा निकाल नुकताच जाहीर केला.या परीक्षेमध्ये मध्ये आत्मगिरी माध्यमिक विद्यालयाचा १००% निकाल लागला असून उज्वल यशाची परंपरा कायम राखली असून स्वरांजली गजूकुमार ढोले हिने ९४.४० टक्के गुण मिळवून विद्यालयात प्रथम तर म्हसवड केंद्रात द्वितीय क्रमांक पटकावला आहे.            शैक्षणिक वर्ष २०२५ -२६ मध्ये म्हसवड येथील क्रांतिवीर शैक्षणिक संकुल  अंतर्गत आत्मगिरी माध्यमिक विद्यालयातील इयत्ता १०वीच्या वर्गाची उज्वल यशाची परंपरा कायम ठेवीत एस एस सी बोर्ड परीक्षेचा निकाल १००% लागला आहे . विद्यालयातील विद्यार्थिनी स्वरांजली गजकुमार ढोले हीने ९४.४०% गुण मिळवून विद्यालयात प्रथम तर म्हसवड केंद्रात दुसरा क्रमांक मिळविला.या विद्यालयाचे प्रथम चार क्रमांक पुढीलप्रमाणे प्रथम स्वरांजली गजकुमार ढोले९४.४०% ,द्वितीय दर्शनी ज्ञानेश्वर लोखंडे ९३.६०% ,तृतीय सुहानी संतोष लोखंडे९०.८०%,चतुर्थ सार्थक दवन खांडेकर९०.४०% गुण संपादन करून उज्वल यश मिळविले.विद्यालयातील एकूण ८२ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते त्यापैकी विशेष प्राविण्य मिळविणारे ३९ विद्यार्थी, तर ३६ विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी व ०७ विद्यार्थ्यांनी द्वितीय श्रेणीचे गुण संपादन केले हे वैशिष्ट्यपूर्ण आहे. सर्व यशस्वी विद्यार्थांचे  संस्थेचे अध्यक्ष कृषिरत्न प्रा.विश्वंभर बाबर ,सचिव सौ.सुलोचना बाबर, उपाध्यक्ष ऍड. इंद्रजित बाबर, तसेच तात्यासाहेब औताडे, शरयू देवकर बाबर, हर्षदा बाबर,मुख्याध्यापक अनिल माने, सर्व शिक्षक व ,शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच पालक  या सर्वांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *