लेखी आश्वासनानंतर सोहम शिर्के यांचे उपोषण स्थगित“मी शांत आहे म्हणजे माघार नाही; सरकारला गॅझेट लागू करण्यास भाग पाडू” — जरांगे पाटीलमान-खटाव

(प्रतिनिधी): मान-खटाव तालुक्यातील जनतेच्या २६ मूलभूत व तातडीच्या प्रश्नांसाठी तसेच मराठा आरक्षणाच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी म्हसवड नगरपालिकेसमोर सुरू असलेले आमरण उपोषण अखेर महत्त्वपूर्ण घडामोडींनंतर स्थगित करण्यात आले आहे. प्रशासनाकडून लेखी आश्वासन मिळाल्यानंतर सामाजिक कार्यकर्ते व आंदोलक नेते सोहम शिर्के यांनी उपोषण तूर्तास स्थगित करण्याचा निर्णय घेतला.गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या या आंदोलनामुळे संपूर्ण मान-खटाव तालुक्यात मोठे वातावरण निर्माण झाले होते. विविध गावांमधून नागरिक, शेतकरी, युवक व महिलांनी मोठ्या संख्येने उपोषणस्थळी उपस्थित राहून पाठिंबा दर्शविला होता. त्यामुळे या आंदोलनाकडे प्रशासनासह संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते.या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षण आंदोलनाचे प्रमुख नेते मनोज जरांगे पाटील यांनी मंगळवारी रात्री उशिरा उपोषणस्थळी भेट देत आंदोलकांशी सखोल चर्चा केली. यावेळी त्यांनी ठाम भूमिका मांडत, “मी शांत आहे म्हणजे माघार घेतली असे समजू नका. सरकारने सातारा गॅझेट तात्काळ लागू केले पाहिजे. गरज पडल्यास आम्ही सरकारच्या छाताडावर बसूनही हा निर्णय करून घेऊ,” असे स्पष्ट केले.दरम्यान, उपोषणाच्या चौथ्या दिवशी सोहम शिर्के यांची प्रकृती खालावू लागली होती. रक्तदाब व साखरेचे प्रमाण कमी होत असल्याने वैद्यकीय पथकाकडून त्यांच्यावर सतत लक्ष ठेवले जात होते. यावेळी जरांगे पाटील यांनी स्वतः त्यांची विचारपूस करून केली. “समाजासाठी लढताना स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणे तितकेच महत्त्वाचे आहे,” असे सांगत त्यांनी आंदोलन पुढील टप्प्यात नेण्याचा सल्ला दिला.तहसीलदार, संबंधित कार्यालयातील अधिकारी तसेच संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांनी उपोषणस्थळी उपस्थित राहून आंदोलकांशी सविस्तर चर्चा केली. एकूण २६ मागण्यांपैकी बहुतांश मागण्यांवर प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेतली असून त्याबाबत लेखी आश्वासन देण्यात आले आहे. यामुळे आंदोलनाला तात्पुरता विराम देण्याचा निर्णय घेण्यात आला.या आंदोलनातील प्रमुख मागण्यांमध्ये मराठा आरक्षणासाठी सातारा गॅझेटियर लागू करणे व कुणबी प्रमाणपत्रासाठी प्रभावी कार्यवाही, अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या योजनांचा पुनरारंभ, वीज बिलातील तफावत दूर करून नवीन डीपी बसवणे, ग्रामसेवक व शिक्षकांना मुख्यालयात राहणे बंधनकारक करणे, दुष्काळी भागात टँकरद्वारे पाणीपुरवठा व जलसंधारण प्रकल्पांचे संरक्षण, तसेच म्हसवड येथे आरोग्य व शिक्षण सुविधांमध्ये तातडीने सुधारणा करणे यांसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांचा समावेश आहे.प्रशासनाकडून येत्या आठ दिवसांत प्रांताधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात येणार असून, प्रत्येक मागणीवर टप्प्याटप्प्याने निर्णय घेऊन अंमलबजावणी करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.या आंदोलनाच्या यशस्वीतेत अनेक कार्यकर्त्यांनी अहोरात्र परिश्रम घेतले. बाळासो हास्पे, नितीन शिंदे, तानाजी पवार, अरविंद जगदाळे, विकास देवकर, डॉ. सौरभ सावंत, गंगाराम शिंदे, मनोज जगदाळे, सचिन जगताप, आकाश माने, गणेश काटकर, अमोल पोळ, बाळासाहेब फडतरे, संदीप फडतरे, रणजीत कदम, अजित शिर्के, हर्षवर्धन कदम, सुधीर माने, रवी गायकवाड, आकाश दडस आणि सचिन शिंगाडे या कार्यकर्त्यांनी मोठे योगदान देत आंदोलन यशस्वी पार पाडले.याबाबत प्रतिक्रिया देताना सोहम शिर्के म्हणाले, “हा लढा संपलेला नाही, तर केवळ स्थगित केला आहे. प्रशासनाने दिलेल्या आश्वासनांची वेळेत पूर्तता झाली नाही, तर आम्ही पुन्हा तीव्र आंदोलन छेडू. मान-खटावच्या गोरगरीब जनतेला न्याय मिळेपर्यंत आमचा संघर्ष सुरूच राहील.”— सोहम शिर्केसामाजिक कार्यकर्ते व आंदोलकजिल्हा उपाध्यक्ष व प्रवक्ता, आम आदमी पार्टी, सातारा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या:
“निर्भया पथकाला बालविवाह रोखण्यात यश; अल्पवयीन मुलीला मिळाले नवजीवन”    |    वडूजच्या विकासासाठी कोट्यवधींचा निधी; सहा महिन्यांत महत्त्वाची विकासकामे मार्गी – नगराध्यक्ष स्वप्नाली गोडसे    |    हिंगणी ग्रामपंचायत कार्यालयाला ग्रामस्थांनी ठोकले टाळे; ग्रामीण मार्ग क्र. १४४ च्या प्रश्नावरून संताप    |    आजचे राशीभविष्य.. 1 जून 2026..    |    म्हसवड येथील नगरवाचनालयात राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची ३०१ वी जयंती उत्साहात साजरी    |    म्हसवड पोलीसांचा दारु भट्टी वर छापा..    |    स्वच्छ बस स्थानक स्पर्धेत म्हसवड पुणे विभागात द्वितीय    |    आपली साथ आणि आशीर्वाद द्या- राजा माने    |    माणदेशी न्यूज - ताज्या घडामोडींसाठी वाचत रहा!