धुळदेव वृत्तसेवा..( सचिन शिंगाडे यांजकडून)-

*“जल जीवन मिशनचा फज्जा! धुळदेवमध्ये पाण्यासाठी माऊलीची वणवण”*माणदेशातील अनेक गावांमध्ये सध्या दुष्काळाची तीव्र झळ जाणवत आहे.

धुळदेव परिसरात परिस्थिती अधिकच गंभीर बनली असून, पाण्याअभावी जनावरांचे हाल होत आहेत.शेतकऱ्यांची पिकं अक्षरशः जळून जात आहेत. पिण्याच्या पाण्यासाठी गावकऱ्यांना 2 ते 3 किलोमीटर अंतरावरून डोक्यावर हंडा घेऊन पाणी आणावे लागत आहे. अनेक विहिरी आटल्या आहेत, तर जिथे थोडंफार पाणी उपलब्ध आहे तिथूनही लोकांना लांबून पाणी वाहून आणावं लागत आहे.काही गावांमध्ये परिस्थिती इतकी बिकट आहे की, एक टँकर पाण्यासाठी तब्बल 3 हजार रुपये मोजावे लागत आहेत.दरम्यान, केंद्र व राज्य सरकारच्या जलजीवन मिशन योजनेचा फज्जा उडाल्याचे चित्र दिसून येत आहे. कामे अपूर्ण असल्याने नागरिकांना अजूनही पाण्यासाठी वनवण भटकावे लागत आहे. दरम्यान, गावकऱ्यांकडून तात्काळ टँकर सुरू करावेत अशी जोरदार मागणी होत आहे.निवडणुकीच्या वेळी आश्वासनांचा पाऊस पडला होता, मात्र प्रत्यक्षात नागरिकांना दुष्काळाच्या झळा सहन करत पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे.आज एक हृदय पिळवटून टाकणारे चित्र समोर आले.रखरखत्या उन्हात, तापलेल्या जमिनीवरून वाळवंटासारख्या माळावरून एक महिला दोन किलोमीटर अंतरावरून डोक्यावर पाण्याचा हंडा घेऊन चालत होती…ही केवळ एका माऊलीची कथा नाही, तर संपूर्ण माण तालुक्यातील अनेक गावांची वेदना आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या:
“निर्भया पथकाला बालविवाह रोखण्यात यश; अल्पवयीन मुलीला मिळाले नवजीवन”    |    वडूजच्या विकासासाठी कोट्यवधींचा निधी; सहा महिन्यांत महत्त्वाची विकासकामे मार्गी – नगराध्यक्ष स्वप्नाली गोडसे    |    हिंगणी ग्रामपंचायत कार्यालयाला ग्रामस्थांनी ठोकले टाळे; ग्रामीण मार्ग क्र. १४४ च्या प्रश्नावरून संताप    |    आजचे राशीभविष्य.. 1 जून 2026..    |    म्हसवड येथील नगरवाचनालयात राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची ३०१ वी जयंती उत्साहात साजरी    |    म्हसवड पोलीसांचा दारु भट्टी वर छापा..    |    स्वच्छ बस स्थानक स्पर्धेत म्हसवड पुणे विभागात द्वितीय    |    आपली साथ आणि आशीर्वाद द्या- राजा माने    |    माणदेशी न्यूज - ताज्या घडामोडींसाठी वाचत रहा!