बिदाल प्रतिनिधी दि “शिक्षण, आरोग्य, रस्ते विकास आणि भ्रष्टाचारमुक्त प्रशासन” या मूलभूत हक्कांसाठी आणि मान-खटाव तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी आम आदमी पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष सोहम शिर्के यांनी म्हसवड नगरपालिकेसमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. “मान-खटाव वाचवा” ही मुख्य घोषणा देत शिर्के यांनी २६ विविध मागण्यांचे हत्यार उपसले असून, जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत लढा मागे न घेण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. आरोग्य आणि शिक्षण व्यवस्थेचे वाभाडेतालुक्यातील आरोग्य व्यवस्थेवर बोलताना शिर्के म्हणाले की, ३५ उपकेंद्रांसाठी केवळ १२ डॉक्टर उपलब्ध आहेत. श्रेणी १ आणि २ च्या रुग्णालयांमध्ये कर्मचारी आणि डॉक्टरांची मोठी कमतरता आहे. शिक्षणाबाबत त्यांनी सांगितले की, तालुक्यात ७५० शिक्षक असूनही जिल्हा परिषद शाळांची पटसंख्या घटत आहे. शिक्षकांनी मुख्यालयांत राहून गुणवत्ता वाढवावी, अशी मागणी त्यांनी केली. प्रमुख मागण्या:सातारा गॅझेटची अंमलबजावणी: मराठा आरक्षणासंदर्भात सातारा गॅझेट तात्काळ लागू करावे. सार्वजनिक स्वच्छता: म्हसवड आणि दहिवडीमधील मुख्य चौकांमध्ये महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहांची सोय करावी. रस्ते दुरुस्ती: धुळदेव जवळील अपघाती क्षेत्राची दुरुस्ती आणि माळशिरस चौकात स्पीड कंट्रोलर बसवणे. भ्रष्टाचार मुक्त सीएसआर: सीएसआर फंडातून होणाऱ्या कामांमधील भ्रष्टाचार थांबवून ग्रामसभेला विश्वासात घ्यावे. उपजिल्हा रुग्णालय: म्हसवड ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा देऊन आवश्यक साधनसामग्री व डॉक्टरांची नियुक्ती करावी. सातारा गॅझेटचा प्रश्न”सातारा गॅझेट लागू करण्यासाठी मंत्र्यांनी शब्द दिला होता, परंतु अनेक महिने उलटूनही काहीच झाले नाही. हे सरकार मराठा समाजाची फसवणूक करत आहे,” असा घणाघाती आरोपही सोहम शिर्के यांनी यावेळी केला. जलसंधारण साठ्यांचे रक्षण, अण्णासाहेब पाटील महामंडळाचे एलओआय (LOI) सुरू करणे आणि नियमित आमसभा घेणे यांसारख्या मागण्यांवर प्रशासन काय भूमिका घेते, याकडे आता संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.फोटो ओळी म्हसवड येथे सोहम शिर्के यांचे आमरण उपोषण सुरू…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या:
“निर्भया पथकाला बालविवाह रोखण्यात यश; अल्पवयीन मुलीला मिळाले नवजीवन”    |    वडूजच्या विकासासाठी कोट्यवधींचा निधी; सहा महिन्यांत महत्त्वाची विकासकामे मार्गी – नगराध्यक्ष स्वप्नाली गोडसे    |    हिंगणी ग्रामपंचायत कार्यालयाला ग्रामस्थांनी ठोकले टाळे; ग्रामीण मार्ग क्र. १४४ च्या प्रश्नावरून संताप    |    आजचे राशीभविष्य.. 1 जून 2026..    |    म्हसवड येथील नगरवाचनालयात राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची ३०१ वी जयंती उत्साहात साजरी    |    म्हसवड पोलीसांचा दारु भट्टी वर छापा..    |    स्वच्छ बस स्थानक स्पर्धेत म्हसवड पुणे विभागात द्वितीय    |    आपली साथ आणि आशीर्वाद द्या- राजा माने    |    माणदेशी न्यूज - ताज्या घडामोडींसाठी वाचत रहा!