पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर गावात चार वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्याऱ्या नराधमाला मृत्युदंड देण्याची शिवस्वराज्य युवा संघटनेची मागणी


प्रतिधीनी पंढरपूर,
नसरापूरमध्ये ३ वर्षांच्या चिमुरडीसोबत जे घडले,ते केवळ एका कुटुंबावरचे संकट नसून आपल्या समाजाच्या ‘सुरक्षित’ असण्याच्या दाव्यावर ओढलेले चाबूक आहेत. ज्या वयात हाताची बोटे धरून पाऊल टाकायचे असते, ज्या वयात फक्त खेळणे आणि हसणे माहिती असते, त्या वयात त्या निरागस वेदवतीला मृत्यूच्या दारात ढकलणाऱ्या त्या नराधमाचे कृत्य ऐकून माणुसकीची मान लाजेने खाली गेली आहे.आपण कोठल्या समाजाकडे निघालो आहोत?६० वर्षांचा एक माणूस ३ वर्षांच्या मुलीवर अत्याचार करतो आणि पुरावा नष्ट करण्यासाठी तिला पोत्यात बांधून गोठ्यात फेकून देतो… हे ऐकतानाही अंगावर काटा येतो. मग विचार करा, त्या पित्यावर काय टाळत असेल जे पुण्यात राहून सात्त्विक मार्गाने पौरोहित्य करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात? आज एका ब्राह्मणाने आपल्या मुलीला गमावले नाहीये, तर महाराष्ट्राने आपली लेक गमावली आहे.आता वेळ आहे एकत्र येण्याची!आपण सोशल मीडियावर पोस्ट टाकून विसरून जातो,पण अशा नराधमांना जोपर्यंत भर चौकात फाशी दिली जात नाही, तोपर्यंत हे सत्र थांबणार नाही.का गप्प राहायचे?कारण उद्या ही वेळ आपल्यावरही येऊ शकते.का लढायचे? कारण आपल्या घरातील लेकीबाळींना सुरक्षित वातावरण देणे हे आपले कर्तव्य आहे.आमची वज्रमुठ मागणी तात्काळ फाशी कायद्याच्या तांत्रिक बाबींमध्ये वेळ न घालवता, या नराधमाला लवकरात लवकर फाशीची शिक्षा सुनावण्यात यावी.पोलिस प्रशासनाचा कडक पहारा: महिला आणि बालकांच्या सुरक्षेसाठी केवळ कायदे नकोत, तर त्यांची कडक अंमलबजावणी हवी. कुटुंबाला जाहीर पाठिंबा: कुलकर्णी कुटुंबाने स्वतःला एकटे समजू नये. संपूर्ण महाराष्ट्र तुमच्या पाठीशी उभा आहे. न्याय मिळेपर्यंत आम्ही शांत बसणार नाही.चला, एक होऊया!जसा छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात महिलांचा अपमान करणाऱ्यांचे हात-पाय तोडले जायचे, तसाच धाक आजच्या नराधमांच्या मनात निर्माण झाला पाहिजे. हा लढा केवळ एका व्यक्तीचा नाही, हा लढा प्रत्येक बापाचा आहे, प्रत्येक भावाचा आहे आणि प्रत्येक सजग नागरिकाचा आहे.
अन्यायाविरुद्धचा हा आवाज मंत्रालयापर्यंत पोहोचला पाहिजे. महाराष्ट्र सरकार आणि पोलिसांनी हे लक्षात ठेवावे की, जनतेचा संयम सुटण्याआधी न्याय झाला पाहिजे!असे मत शिवस्वराज्य युवा संघटन महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदीपराजे मुटकुळे-पाटील म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या:
“निर्भया पथकाला बालविवाह रोखण्यात यश; अल्पवयीन मुलीला मिळाले नवजीवन”    |    वडूजच्या विकासासाठी कोट्यवधींचा निधी; सहा महिन्यांत महत्त्वाची विकासकामे मार्गी – नगराध्यक्ष स्वप्नाली गोडसे    |    हिंगणी ग्रामपंचायत कार्यालयाला ग्रामस्थांनी ठोकले टाळे; ग्रामीण मार्ग क्र. १४४ च्या प्रश्नावरून संताप    |    आजचे राशीभविष्य.. 1 जून 2026..    |    म्हसवड येथील नगरवाचनालयात राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची ३०१ वी जयंती उत्साहात साजरी    |    म्हसवड पोलीसांचा दारु भट्टी वर छापा..    |    स्वच्छ बस स्थानक स्पर्धेत म्हसवड पुणे विभागात द्वितीय    |    आपली साथ आणि आशीर्वाद द्या- राजा माने    |    माणदेशी न्यूज - ताज्या घडामोडींसाठी वाचत रहा!