​पुणे: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती आणि सुप्रसिद्ध कवयित्री सौ. कविता काळे यांचा वाढदिवस यांचे औचित्य साधून पुण्यात एका भव्य साहित्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात ‘गुंता’ या लोकप्रिय काव्यसंग्रहाच्या द्वितीय आवृत्तीचे प्रकाशन आणि ज्येष्ठ गझलकार प्रकाशजी बनसोडे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ ‘गझल गौरव सन्मान’ प्रदान करण्यात आला होता ​कार्यक्रमाची रूपरेषा: हा सोहळा शनिवार, दिनांक २५ एप्रिल २०२६ रोजी दुपारी ४:०० वाजता पुण्याच्या सांस्कृतिक वैभवाचे केंद्र असलेल्या महाराष्ट्र साहित्य परिषद (टिळक रस्ता) येथे पार पडला. ​मान्यवरांची उपस्थिती: कार्यक्रमाचे उद्घाटन पुणे महानगरपालिकेचे नगरसेवक डॉ. दादा ज्ञानोबा कोद्रे आणि जिल्हा परिषद सदस्य सौ. वंदना महादेव कोद्रे यांच्या हस्ते झाले . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मराठी अभ्यास मंडळाचे प्रा. डॉ. संदीप सांगळे भूषविणार होते . महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यवाह आ. वि.दा. पिंगळे यांच्या शुभहस्ते विविध उपक्रम संपन्न झाला . ​विशेष आकर्षण आणि सन्मान: या सोहळ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे सुप्रसिद्ध ज्येष्ठ गझलकार आ. मसुद पटेल यांना दिला जाणारा विशेष ‘गझल गौरव सन्मान’. तसेच, छत्रपती शिवाजी महाराज यांचे सचिव वकील पारसनीस शिव श्री काझी हैदर शेख यांचे १३ वे वंशज आ. सोहेल शमशुद्दीन शेख यांची विशेष सन्माननीय उपस्थिती या कार्यक्रमाला लाभली. ​याप्रसंगी ‘आम्ही सिद्ध लेखिका’च्या अध्यक्षा आ. मनीषा रायजादे यांची प्रमुख उपस्थिती आणि ज्ञानज्योत फाउंडेशनच्या कार्याध्यक्षा आ. कांचन मुन यांची स्वागताध्यक्ष म्हणून उपस्थिती लाभली ​आयोजन कविता काळे, ज्ञानज्योत फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ. कविता काळे तसेच कांचन मुन, बाळासाहेब काळे जोत्स्ना काळे तन्वी काळे तसेच रघुनाथ कांबळे, रेखा फाले सुरेखा चिखलकर, प्रतिमा काळे, मीनाक्षी बोरय्या यांनी य केले असून, सुप्रसिद्ध निवेदक मा. गणेश मोढवे आपल्या ओघवत्या शैलीत या सोहळ्याचे सूत्रसंचालन केलं . ​साहित्यिक आणि गझल प्रेमींसाठी ही एक पर्वणीच असून, या सोहळ्याला रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहिले , . कार्यक्रमाला साहित्य सम्राट संस्थेचे सर्व पदाधिकारी, सागर काकडे जितेन सोनवणे , विमलाबाई लुंकंड विद्यालयाचे सर्व शिक्षक मंडळी आ, महेंद्र कदम, विना कडू, राम सर्वगोड, लक्ष्मन शिंदे, नाशिक वरून बाळासाहेब गिरी, आकाश बोरडे,स्वाती भासले,सीताराम नरके सुवर्णा वाघमारे, रावसाहेब खंडागडे, पूजा भंडारी, कृष्णा भंडारी उत्कृष्ट असं काव्यसंग्रह तयार करून देणारे आमचे लाडके भाऊजी भास्कर पाटील (सांगली ) सुंदर अशी फोटोग्राफी करणारे राहुल जाधव दादा, तसेच छान अल्पउपहार तयार करून देणारे, सुधा पांचाळ इत्यादीच्या उपस्थिती मध्ये कार्यक्रम पार पडला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *