मुंबई : आर्यारवी एंटरटेनमेंट प्रस्तुत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय लघुपट पुरस्कार सोहळा २०२६ हा दिमाखदार सोहळा येत्या गुरुवार, दिनांक ३० एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ५.३० वाजता आयोजित करण्यात आला आहे. हा भव्य कार्यक्रम के. एम. एस. डॉ. शिरोडकर हायस्कूल, शिशु विकास हॉल, तळमजला, डॉ. ई. बोस रोड, जन्नतुल्लाह हॉस्पिटल समोर, परेल (पूर्व), मुंबई येथे पार पडणार आहे.चित्रपट आणि कला क्षेत्रातील गुणवंतांना प्रोत्साहन देण्यासाठी या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून, देश-विदेशातील उत्कृष्ट लघुपटांना या व्यासपीठावर सन्मानित केले जाणार आहे. यंदा हा सोहळा चौथ्या वर्षात पदार्पण करत असून, दरवर्षीप्रमाणे याही वर्षी विविध श्रेणींमध्ये पुरस्कारांचे वितरण होणार आहे.या सोहळ्यात जीवनगौरव, रंगकर्मी, कलाभूषण तसेच समाजभूषण अशा मानाच्या पुरस्कारांनी विविध क्षेत्रातील मान्यवरांना गौरविण्यात येणार आहे. लघुपट निर्माते, दिग्दर्शक, कलाकार आणि तांत्रिक क्षेत्रातील तज्ज्ञांना आपले कौशल्य सादर करण्यासाठी हा एक महत्त्वपूर्ण मंच ठरणार आहे.कार्यक्रमाचे संयोजन प्रसिद्ध सिने-नाट्य अभिनेते, दिग्दर्शक व पत्रकार श्री. महेश्वर भिकाजी टोटांडे यांनी केले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा अधिक आकर्षक आणि संस्मरणीय ठरण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.या कार्यक्रमास विविध सामाजिक, सांस्कृतिक व व्यावसायिक संस्थांचे सहकार्य लाभले असून, मोठ्या संख्येने चित्रपटप्रेमी, कलाकार आणि मान्यवर उपस्थित राहणार आहेत. लघुपटांच्या माध्यमातून सामाजिक संदेश देणाऱ्या कलावंतांचा सन्मान करण्याचा हा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद ठरत आहे.
राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय लघुपट पुरस्कार सोहळा २०२६ उत्साहात पार पडणार














Leave a Reply