माण तालुक्यात ‘गोसेवा सन्मान अभियान’ अंतर्गत तहसीलदारांना निवेदन

बिदाल प्रतिनिधी :

माण तालुक्यातील गोपालक, गोसेवक आणि गोप्रसारक शेतकरी यांच्या वतीने ‘गोसेवा सन्मान अभियान’ अंतर्गत नुकतेच दहिवडी येथे तहसीलदार विकास अहिर यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.

गोवंश संरक्षण, संवर्धन आणि गोपालकांचे प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचवण्यासाठी हे अभियान राबवले जात आहे. देशी गायींचे महत्त्व जनमानसात रुजावे आणि गोशाळांना तसेच वैयक्तिक गोपालकांना शासनाकडून योग्य सहकार्य मिळावे, अशी भावना या निवेदनातून व्यक्त करण्यात आली आहे.

याप्रसंगी गोपालक अशोक इंगवले, गव्यसिद्ध वैद्य हेमंत पोळ, सुरेश नाना बोराटे, बालाजी जगदाळे, डॉ. रंगनाथ खांडे, गुंडाशेठ ओगले आणि राहुल टिळेकर उपस्थित होते.

तसेच म्हसवड परिसरातील गव्यसिद्ध नरोत्तमदास माने, वैद्य गव्यसिद्ध दिग्विजय माने, धनंजय टेके महाराज, अण्णा हणमंत जाधव महाराज यांच्यासह परिसरातील मोठ्या संख्येने शेतकरी वर्ग या अभियानात सहभागी झाला होता. प्रशासनाने या मागण्यांवर सकारात्मक विचार करावा, अशी मागणी यावेळी सर्व गोसेवकांनी केली.

 

दहिवडी येथे‘गोसेवा सन्मान अभियान’ अंतर्गत तहसीलदारांना निवेदन (छायाचित्र आकाश दडस)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *