सपोनि पोमण यांना नवीन आव्हाने पेलणार काय सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पोमन यांच्यासमोर प्रचंड मोठी आव्हाने उभी आहेत. म्हसवड वृत्तसेवा म्हसवड शहरात नव्याने रुजू झालेले सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पोमन यांच्यासमोर अनेक मोठी आव्हाने उभी असून अवैद्य व्यवसाय, वाळू माफिया व मटका जुगार अड्डा इत्यादी व्यवसायिक यांचा राजकीय वरदहस्त यामुळे अनेक आव्हाने तयार झालेले आहेत ही आव्हाने कसे पेलणार याकडे म्हसवड करांचे लक्ष लागले आहे. मागील दोन महिन्यापूर्वीच म्हसवडचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांची बदली झालेली आहे यानंतर दोन महिने हे पद रिक्त होते मसवडचा तात्पुरता चार्जर दहिवडी पोलीस निरीक्षक दराडे यांच्याकडे सोपवण्यात आलेला होता. यानंतर म्हसवड शहरासाठी सक्षम अधिकाऱ्याची मागणी नागरिकाकडून होत असताना म्हसवड शहरासाठी कोरेगाव येथे कार्यरत असणारे संदीप पोमन यांची नियुक्ती म्हसवड येथील सहायक पोलीस निरीक्षक म्हणून करण्यात आलेले आहे. म्हसवड शहर हे अतिशय संवेदनशील शहर असल्यामुळे वारंवार येथे नागरिक व अधिकारी यांच्यात गैरसमज झालेले दिसून येत आहेत राजकीय दबावामुळे पोलीस अधिकारी सामान्य माणसावर अन्याय करीत असल्याचे चित्र वारंवार दिसून येत आहे. यामुळे म्हसवड शहरातील शांतता धोक्यात आली असून म्हसवड शहर हे अवैद्य व्यावसायिकांचे माहेरघर बनलेले आहे आणि यातच अवैध व्यवसाय करणाऱ्या लोकांचा राजकारणात असणारा दबदबा असल्यामुळे या म्हसवड शहरातील सरकारी कार्यालय अवैध व्यवसायाच्या अधिपत्याखाली सुरू आहेत कि काय? कसा प्रश्न निर्माण झाला आहे. गेली अनेक वर्ष म्हसवड शहरात सक्षम अधिकारी न लाभल्यामुळे म्हसवड शहरांमध्ये राजरसपणे सर्व प्रकारचे अवैध व्यवसाय बिनधास्तपणे सुरू आहेत. यावर आळा घालण्याऐवजी या व्यवसायिकांना सर्व प्रकारची मदत करण्यासाठी पोलीस खाते व महसूल खाते मोठ्या प्रमाणामध्ये प्रयत्नशील असल्याचे दिसून येत आहे. यामुळे सर्वसामान्य माणसाचा आवाज दबला गेला असून सामान्य माणसावर होणाऱ्या अत्याचाराला सरकार न्याय देणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे. यापूर्वीच्या अधिकाऱ्यांवर नागरिकांनी अनेक आरोप केले असून मागील तीन वर्षांमध्ये म्हसवड शहरात अवैध व्यावसायिकांनी बस्तान बांधल्यामुळे सामान्य माणसावर निरापराध व्यक्तींवर विविध प्रकारचे खोटे गुन्हे दाखल करण्यात आले होते. याबाबत नागरिकांनी आवाज उठवल्यामुळे म्हसवड येथील सहायक पोलीस निरीक्षक यांची दोन वेळा बदली झालेली होती. मात्र राजकीय वरदहस्तापोटी ही बदली रद्द करण्यात आलेली असताना पुन्हा येथे म्हसवड शहरासाठी सक्षम अधिकारी नेमणे गरजेचे होते मात्र येथे सक्षम अधिकारी येण्यास तयार नसल्यामुळे अखेर कोरेगाव येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक पोमण यांची नियुक्ती करण्यात आली आहे. Post navigation पुणे आय.एल.एस. विधी महाविद्यालय, शुल्क वसुली प्रकरणी सखोल चौकशी करणार-उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील हिंगणीतील शेतकऱ्यांचा आदर्श निर्णय; 20 वर्षांचा पानंद रस्त्याचा वाद मिटवून स्वखर्चाने उभारला रस्ता