म्हसवड येथे शिवजयंती निमित्त आशिष काटे महाराज यांचे सुश्राव्य कीर्तन.. म्हसवड : वृत्तसेवा –आई वडिलांची सेवा हिच ईश्वर सेवा समजून आजच्या तरुणांनी आई वडिलांची सेवा करावी.आई-वडिलांच्या सेवे सारखे दुसरे पुण्यकर्म तुम्हाला कशातही शोधून मिळणार नाही.रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपल्या रयतेला आई वडिल समजून सेवा केली.असा हा एकमेव राजा होता,असे मत हभप आशिष महाराज काटे यांनी व्यक्त केले.म्हसवड येथे शिवजयंती उत्सवानिमित्त आयोजित किर्तनात ते बोलत होते.तिथीनुसार छत्रपती शिवाजी महाराज यांची दरवर्षी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर जयंती साजरी केली जाते. यावर्षी माजी नगरसेवक गणेश रसाळ, अनिल कांबळे, ओम कलाविष्कार ग्रुपचे महेश सोनवणे आदी शिवप्रेमी व शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने तीन दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.शुक्रवारी सायंकाळी सहा वाजता पुरोहितांच्या मंत्रोच्चारात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी नगराध्यक्ष पुजा विरकर, उपाध्यक्षा श्रीदेवी पिसे, सभापती दिपाली शिंदे, माजी उपनगराध्यक्ष व नगरसेविका स्नेहल सुर्यवंशी, चैताली शिंदे, प्रमिला ढाले, पाणीपुरवठा सभापती युवराज सुर्यवंशी, प्रज्योत कलढोणे, सचिन विरकर, धनाजी शिंदे, रतन ढाले, संतोष शेटे, प्रविण दोशी, जितेंद्र गांधी, निशांत पिसे, नगरसेवक लखन लोखंडे, नगरसेविका सविता मासाळ आदी उपस्थित होते. तर सुरेल गितांच्या कार्यक्रमास तेजसिंह राजेमाने, अॅड. पृथ्वीराज राजेमाने, गणपतराव राजेमाने, सयाजीराजे राजेमाने, विश्वजित राजेमाने, इंजि. बाळासाहेब माने, धनाजी माने, किरण कलढोणे, शिवाजी जाधव, सह सभापती युवराज सुर्यवंशी, नगरसेविका स्नेहल सुर्यवंशी दिपाली शिंदे, पत्रकार विजय टाकणे आदी उपस्थित होते.… Post navigation अर्जंट पदे भरणे आहेत पंढरपूर विकास आराखड्याच्या कामास गती देण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश