दहिवडी (प्रतिनिधी) : प्रशासकीय सेवेचे स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणाऱ्या ‘चैतन्य अभ्यासिका’चा भव्य शुभारंभ रविवार, १९ एप्रिल २०२६ रोजी सकाळी १० वाजता दहिवडी येथील राजहंस प्लाझा, फलटण चौक येथे आयोजित करण्यात आला आहे. ‘चैतन्य करिअर अकॅडमी’च्या वतीने हा उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आला असून विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी सुसज्ज व शांत वातावरण उपलब्ध करून देण्याचा या उपक्रमामागील उद्देश आहे.या कार्यक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री मा. ना. श्री. जयकुमारजी गोरे (भाऊ) यांच्या शुभहस्ते होणार आहे. तसेच मा. सौ. सोनियाताई जयकुमार गोरे (संचालिका, श्री सिद्धनाथ पतसंस्था, दहिवडी) यांचीही प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.यावेळी नगराध्यक्षा मा. सौ. वर्षाराणी बाळासाहेब सावंत, उपजिल्हाधिकारी उज्वला गाडेकर, तहसीलदार विकास अहिरे, मुख्याधिकारी संदीप घार्गे, गटविकास अधिकारी प्रदीप शेंडगे, पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे व सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांसह विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत.‘चैतन्य करिअर अकॅडमी’ने आतापर्यंत महाराष्ट्राच्या मातीत हजारो वर्दीधारी अधिकारी घडवण्याचे कार्य केले असून आता ‘चैतन्य अभ्यासिका’च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी स्वतंत्र, आधुनिक व सुविधायुक्त जागा उपलब्ध करून देण्याचा महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. धावपळीच्या युगात विद्यार्थ्यांच्या बौद्धिक कष्टांना योग्य दिशा देण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा ठरणार आहे.या कार्यक्रमास उपस्थित राहून विद्यार्थ्यांच्या या नव्या उपक्रमास प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन ‘चैतन्य करिअर अकॅडमी’ परिवाराने केले आहे.“तुमची जिद्द, आमची साथ; यशाचा नवा इतिहास!” या ब्रीदवाक्याखाली अकॅडमी विद्यार्थ्यांच्या यशासाठी कटिबद्ध असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. Post navigation अपहरण झालेल्या व्यक्तीने आरोपीला घेऊन सातारा जिल्हा परिषद सभागृहात दिली धडक मायणी येथील शिवाजी कचरे दुःखद निधन..