खारघर/सातारा- प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था (MSACS) अंतर्गत कार्यरत NGO ने शाखा व कॉलेजमध्ये HIV व एड्स संदर्भात जनजागृती कार्यक्रम राबविले.
या कार्यक्रमांमध्ये HIV व एड्स संबंधी माहिती देण्यात आली. त्यामध्ये HIV कसा पसरतो, त्याची लक्षणे, तसेच त्यावर नियंत्रण कसे ठेवावे याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना रक्ताद्वारे होणाऱ्या संसर्गाबाबत, असुरक्षित लैंगिक संबंधांमुळे होणारे धोके, तसेच इंजेक्शनद्वारे संसर्ग कसा होतो याची माहिती देण्यात आली.
विशेषतः 15 ते 24 वर्षे वयोगटातील तरुणांमध्ये HIV संसर्गाचे प्रमाण वाढत असल्याने, त्यांना याबाबत योग्य माहिती व समुपदेशन देणे अत्यंत गरजेचे आहे.
युवक-युवतींमध्ये सुरक्षित वर्तन, सुरक्षित लैंगिक संबंध, तसेच संसर्ग टाळण्यासाठी आवश्यक खबरदारी याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. यामध्ये कंडोमचा योग्य वापर, एकनिष्ठ संबंधांचे महत्त्व आणि HIV तपासणीचे फायदे समजावून सांगण्यात आले.
अशा प्रकारच्या जनजागृती कार्यक्रमांमुळे तरुणांमध्ये HIV/एड्सविषयीची भीती कमी होऊन योग्य माहिती मिळते व समाजात सकारात्मक बदल घडून येण्यास मदत होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या:
“निर्भया पथकाला बालविवाह रोखण्यात यश; अल्पवयीन मुलीला मिळाले नवजीवन”    |    वडूजच्या विकासासाठी कोट्यवधींचा निधी; सहा महिन्यांत महत्त्वाची विकासकामे मार्गी – नगराध्यक्ष स्वप्नाली गोडसे    |    हिंगणी ग्रामपंचायत कार्यालयाला ग्रामस्थांनी ठोकले टाळे; ग्रामीण मार्ग क्र. १४४ च्या प्रश्नावरून संताप    |    आजचे राशीभविष्य.. 1 जून 2026..    |    म्हसवड येथील नगरवाचनालयात राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची ३०१ वी जयंती उत्साहात साजरी    |    म्हसवड पोलीसांचा दारु भट्टी वर छापा..    |    स्वच्छ बस स्थानक स्पर्धेत म्हसवड पुणे विभागात द्वितीय    |    आपली साथ आणि आशीर्वाद द्या- राजा माने    |    माणदेशी न्यूज - ताज्या घडामोडींसाठी वाचत रहा!