हलगी नाद आंदोलनाने झेडपी परिसर दुमदुमला !५ व्या दिवसाखेर आमरण उपोषण यशस्वी ।।

सातारा : शिरढोण,ता. कोरेगाव येथील मागासवर्गीय महिलांना शौचालय नसल्याने रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष विशाल भोसले यांनी जिल्हा परिषदेसमोर आमरण उपोषण पाचव्या दिवसीय सुरूच ठेवले होते.घंटानाद आंदोलनाने संपूर्ण परिसर दणाणून गेला होता.सर्व मागण्या मान्य केल्याने आंदोलनाचा लढा यशस्वी झाला.त्यामुळे आंदोलन स्थगित करण्यात आले.
शेवटच्या दिवशी बहुजन समाज पार्टीचे सचिव विकास बैले, दलित महासंघाचे उमेश चव्हाण, महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष किरण बगाडे,गणेश वाघमारे आदींनी भेटी देऊन जाहीर पाठींबा दिला होता. यावेळी पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला व पहिल्या दिवसापासून वृत्तांकन करणारे अनिल वीर उपस्थित होते.
विस्ताराधिकारी नंदकुमार माने यांच्या हस्ते लिंबू सरबत विशाल भोसले यांनी दिल्याने घोषणांनी सांगता झाली.यावेळी ग्रामसेवक प्राची कदम,जालिंदर मस्के आदी उपस्थित होते.
पहिल्याच दिवशी आंदोलन सुरू होताच प्रशासनाने शौचालयाचे काम सुरू केलेले आहे.शिवाय,प्रशासनावर केलेल्या आरोप व गुन्हे दाखल केलेले आहेत.त्याचीही चौकशी करण्यासाठी मुख्यकार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी ऍडशनल कमिटी उपमुख्यकार्यकारी अधिकारी
राहुल गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली नियुक्त केली आहे.
यापूर्वीही ९ दिवस आंदोलन केले होते.तेव्हाही शौचालयाचे बांधकाम करण्यासाठी दगड, वाळू वैगरे साहित्य आणून टाकले होते.मात्र,बांधकाम स्थगित ठेवले होते.हा मागील अनुभव असल्याने पूर्ण बांधकाम केल्यानंतरच आमरण उपोषण सोडण्याचा निर्धार विशाल भोसले यांनी केला होता. समाजाची आठ शौचालय पाडून गेले ५ महिने महिला उघड्यावर शौचाल्यास जात आहेत.मुळातच तालुक्यात प्रसाकीय अधिकारी महिलाच असून कारवाई का नाही? असा संतप्त सवालही करण्यात येत होता.यापूर्वी,९ दिवस आंदोलन करण्यात आले होते.तरीदेखील न्याय मिळाला नव्हता.तेव्हा या प्रकरणात दोषी असलेले गटविकास अधिकारी, ग्रामसेवक व ग्रामपंचायत सरपंच यांना तातडीने निलंबित केले पाहिजे. जाणून-बुजून मागासवर्गीय समाजावरती अन्याय झाला आहे. कोणतीही कारवाई न केल्यामुळे तात्काळ निलंबित करावे.अशा आशयाचे निवेदन जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी यांना दिले होते.
शेवटच्या दिवशी विशाल भोसले यांच्यासमवेत मुख्य मार्गदर्शक तथा पक्षाचे नेते रमेश उबाळे,शाहू भोसले, नितीन रोकडे,दीपक गाडे,गौतम रणदिवे,गणेश खंडाईत,राजेंद्र खंडाईत,चंद्रकांत उत्तम खंडाईत, जगन्नाथ खंडाईत,विजय खंडाईत,सचिन कांबळे,गौतम खंडाईत,यदु खंडाईत आदी मान्यवर,शिरढोनच्या महिला व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

फोटो : विशाल भोसले यांना आंदोलन स्थगितीचे पत्र देताना विस्ताराधिकारी नंदकुमार माने शेजारी मान्यवर व कार्यकर्ते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *