पंढरपूर प्रतिनिधीपंढरपूर येथील सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार प्राप्त विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान यांच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंती महोत्सवानिमित्त डिजिटल मीडियातील उल्लेखनीय कार्याबद्दल पत्रकार प्रशांत माळवदे यांचा श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती सदस्य हभप ज्ञानेश्वर महाराज जळगावकर यांच्या हस्ते शाल, फेटा, हार, सन्मानपत्र, सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डी राज सर्वगोड समितीचे अध्यक्ष श्रीकांत चंदनशिवे सचिव ज्ञानेश्वर कांबळे, डिजिटल मीडिया पत्रकार संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष प्रवीण नागणे, शेतकरी संघटनेचे नेते प्रभाकर भैय्या देशमुख, माजी नगराध्यक्ष उज्वला भालेराव, प्रा.अनिल ननवरे,सल्लागार नितीन काळे,प्रा.सुदाम गायकवाड, प्रा. राजुभाई मुलानी ,अपराजित सर्वगोड, रामदास नागटिळक,विशाल आर्वे आदि मान्यवर उपस्थित होते.
हा पुरस्कार मिळाल्याबद्दल श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती सदस्य संभाजी शिंदे, अन्न आयोग अध्यक्ष महेश ढवळे, एलआयसी विकास अधिकारी बी एस चौगुले, जिल्हा परिषद सदस्य सुप्रिया गायकवाड, पंचायत समिती सदस्य विजय शिंदे,अक्काताई लोखंडे,सरपंच रणजीत जाधव, न्यू इंग्लिश स्कूलचे प्राचार्य के डी शिंदे,वसंतराव काळे हायस्कूलचे मुख्याध्यापक संजय काळे,संस्कार इंग्लिश मीडियम स्कूलचे अध्यक्ष सीताराम माने व समस्त ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या:
“निर्भया पथकाला बालविवाह रोखण्यात यश; अल्पवयीन मुलीला मिळाले नवजीवन”    |    वडूजच्या विकासासाठी कोट्यवधींचा निधी; सहा महिन्यांत महत्त्वाची विकासकामे मार्गी – नगराध्यक्ष स्वप्नाली गोडसे    |    हिंगणी ग्रामपंचायत कार्यालयाला ग्रामस्थांनी ठोकले टाळे; ग्रामीण मार्ग क्र. १४४ च्या प्रश्नावरून संताप    |    आजचे राशीभविष्य.. 1 जून 2026..    |    म्हसवड येथील नगरवाचनालयात राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची ३०१ वी जयंती उत्साहात साजरी    |    म्हसवड पोलीसांचा दारु भट्टी वर छापा..    |    स्वच्छ बस स्थानक स्पर्धेत म्हसवड पुणे विभागात द्वितीय    |    आपली साथ आणि आशीर्वाद द्या- राजा माने    |    माणदेशी न्यूज - ताज्या घडामोडींसाठी वाचत रहा!