म्हसवड (सुशिल त्रिगुणे)-
ज्ञानदानाचे आदर्श काम करून केंद्रप्रमुख नंदकुमार तुपे यांनी भावी पिढीला एक वेगळा आदर्श निर्माण करून दिला असल्याचे प्रतिपादन माण पंचायत समितीचे सभापती विक्रम शिंगाडे यांनी पुळकोटी येथे सारजाई मंगल कार्यालयात कार्यक्रमात केले.
केंद्रप्रमुख नंदकुमार तुपे यांचा सेवापूर्ती समारंभ सारजाई कार्यालय म्हसवड पुळकोटी रोड या ठिकाणी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी माण पंचायत समितीचे सभापती विक्रम शिंगाडे, जिल्हा परिषद सदस्या शितल रणपिसे, राज्य नेते प्राथमिक शिक्षक समिती उदयजी शिंदे, माजी सभापती रमेश पाटोळे, माजी जिल्हा परिषद सदस्य दिलीप तुपे, म्हसवड नगरपालिकेच्या नगरसेविका चैताली शिंदे, गटशिक्षणाधिकारी लक्ष्मण पिसे, विस्ताराधिकारी विजय गंबरे, शमिमबानू तांबोळी,केंद्रप्रमुख महेंद्र हजारे, दीपक पतंगे, शोभा पवार, साधना झणझणे तसेच शिक्षक बँकेचे संचालक विजय बनसोडे, नितीन काळे ,शिक्षक समितीचे नेते, प्रवक्ते सुशील त्रिगुणे, त्याचबरोबर इतर सर्व शिक्षक संघ, समितीचे आजी-माजी पदाधिकारी त्याचबरोबर शिक्षक बंधू भगिनी, मित्र मंडळी,आप्तेष्ट, नातेवाईक उपस्थित होते .
कार्यक्रमाच्या सुरुवातीस प्रमुख मान्यवरांचे स्वागत करून सावित्री मातेच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करून प्रमुख पाहुण्यांनी कार्यक्रमास सुरुवात केली . यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक अशोक जमाले यांनी केले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माण पंचायत समितीचे सभापती विक्रम शिंगाडे हे आवर्जून उपस्थित होते. त्यावेळी माजी सभापती रमेश पाटोळे यांनीही तुपे यांच्याबद्दल थोडक्यात परिचय करून दिला. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे नेते उदयराव शिंदे यांनी नंदकुमार तुपे यांचे संघटनेतील कार्य आणि योगदान याविषयी सखोल अशी माहिती दिली. त्याचवेळी दिलीप तुपे यांनी शिक्षक हा समाज सुधारण्याचा कसा कणा आहे हे सविस्तर सांगून सर्व शिक्षकांना मार्गदर्शन केले तसेच यावेळी त्यांचे बंधू प्राध्यापक भगवान तुपे यांनीही त्यांच्याविषयी माहिती देऊन आपलं मनोगत व्यक्त केले. यावेळी माण पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी लक्ष्मण पिसे यांनीही तुपे यांच्या कार्याबद्दल उल्लेखनीय प्रशंसा केली व पुढच्या आयुष्यासाठी तसे शिक्षण क्षेत्रातील कमतरतेसाठी त्यांना आवर्जून सहकार्य करावे अशी अपेक्षा व्यक्त केली. नंदकुमार तुपे यांनी स्वतः च्या मनोगतामध्ये त्यांच्या नोकरीच्या सुरुवातीपासून ते सेवानिवृत्ती पर्यंत चा प्रवास सांगितला..अध्यक्ष म्हणून सभापती विक्रम शिंगाडे यांनी नंदकुमार तुपे यांच्या विषयी सलोख्याचे आणि जिव्हाळ्याचे मनोगत व्यक्त करुन त्यांना पुढील भावी आयुष्यासाठी खूप शुभेच्छा दिल्या.यावेळी शिक्षकांमधून शिवाजी शिंगाडे,सुजाता कुंभार, सुशीला बनसोडे यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल पाटोळे आणि शिवाजी शिंगाडे यांनी केले, तर कार्यक्रमाचे आभार रवी तुपे यांनी मांडले. यावेळी मोठ्या संख्येने शिक्षक वर्ग, मित्रमंडळी व त्यांच्या परिवारातील सर्व सदस्य उपस्थित होते.
