उत्तर कोरेगाव तालुक्यात घरगुती गॅसचा तुटवडा

काळाबाजाराला आळा बसणार का? घरगुती गॅस अभावी ग्रामस्थांची मोठी गैरसोय

पिंपोडे बुद्रुक/प्रतिनिधी/अभिजीत लेंभे

उत्तर कोरेगाव तालुक्यासह परिसरातील ग्रामीण भागात सध्या घरगुती एलपीजी गॅसचा तीव्र तुटवडा जाणवत असून नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. गॅस सिलिंडर वेळेवर उपलब्ध होत नसल्यामुळे स्वयंपाकासाठी महिलांना पुन्हा चुलीचा आधार घ्यावा लागत आहे.या परिस्थितीचा गैरफायदा घेत काही ठिकाणी मुद्दाम गॅसचा काळा बाजार सुरू असल्याची गंभीर बाब समोर येत आहे. गेल्या काही दिवसांन पासून गॅस एजन्सीकडे सिलिंडरची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे मात्र पुरवठा कमी असल्याने अनेक ग्राहकांना आठवड्यां पर्यंत प्रतीक्षा करावी लागत आहे.

ऑनलाइन बुकिंग करूनही वेळेत सिलिंडर मिळत नसल्याने नागरिक संतप्त झाले आहेत. विशेषतः ग्रामीण भागात वाहतूक आणि वितरण व्यवस्थेतील अडचणींमुळे परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे. दरम्यान काही ठिकाणी घरगुती गॅसचा काळाबाजार करणारे एजंट आणि दलाल जास्त दराने हॉटेल व्यवसायिकांना सिलिंडर विक्री करत असल्याच्या तक्रारी ग्रामस्थांच्या मधून येत आहेत. शासनाने ठरवले ल्या दरापेक्षा ७०० रुपयापेक्षा अधिक दराने घरगुती गॅस टाकी विकली जात असल्याचे काही ग्रामस्थांच्या वतीने सांगण्यात आले

असून त्यामुळे सामान्य नागरिकांच्या खिशावर अतिरिक्त आर्थिक भार पडत आहे.
घरगुती गॅस टाकी बुकिंग करून देखील ठराविक वेळेत न मिळाल्या ने महिलांना या समस्येचा सर्वाधिक त्रास सहन करावा लागत आहे. गॅस नसल्याने चुलीवर स्वयंपाक करावा लागत असून यामुळे आरोग्यावरही परिणाम होत आहे. लहान मुले, वृद्ध यांच्यासाठी वेळेवर अन्न तयार करणे कठीण बनले आहे. ग्रामीण भागातील अनेक कुटुंबांनी या समस्येबाबत संताप व्यक्त केला आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तातडीने लक्ष घालून गॅस पुरवठा सुरळीत करण्याची गरज आहे. घरगुती गॅसचा काळाबाजार करणाऱ्या गोडाऊन चालक व एजंट यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे. संबंधित गॅस कंपन्यांनी वितरण व्यवस्था अधिक सक्षम करून प्रत्येक ग्राहकाला वेळेत सिलिंडर उपलब्ध करून द्यावे अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

ग्रामस्थांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित असलेल्या या गंभीर समस्येवर लवकरात लवकर शासनाने तोडगा काढावा गॅसचा काळाबाजार रोखण्यासाठी तालुकास्तरावर एक समिती तयार करून तालुक्यातील विविध गॅस गोडाऊनवर छापा मारून जाणीवपूर्वक युद्धजन्य परिस्थितीचा फायदा घेऊन चढ्या दराने खाजगी हॉटेल यांना गॅस टाकीचा पुरवठा करणाऱ्या संबंधित गॅस एजन्सीवर योग्य ती कारवाई करण्यात यावी. सध्या गॅसचा मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवत आहे. तरी शासनाने घरगुती गॅस अभावी गोरगरिबांची चाललेली गैरसोय दूर करून योग्य त्या उपाययोजना राबवाव्यात असे सर्वसामान्य ग्रामस्थातून बोलले जात आहे. घरगुती गॅस संदर्भात तोडगा निघेल का, आणि काळा बाजाराला आळा बसेल का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या:
पुणे जिल्ह्यात शेतकरी सेनेचे संघटन वाढवणार- कृषिरत्न विश्वंभर बाबर    |    17 रोजी शिरताव येथे महा राजस्व अभियान    |    मायणी येथील हनुमंत चव्हाण यांचे निधन    |    शिरताव येथे 17 रोजी महाराजस्व अभियान, सर्व प्रकारचे दाखले मिळणार.    |    क्रांतिवीर सीबीएसई स्कूलचे घवघवीत यश ,समर्थ मंगरुळे प्रथम क्रमांक    |    दहिवडी कृषी कार्यालयातील स्वच्छतागृहांची दुरवस्था    |    आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमिवर जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. यांनी केली विविध ठिकाणची पाहणी    |    विश्वभूषण डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान कडून प्रशांत माळवदे यांचा सन्मान    |    माणदेशी न्यूज - ताज्या घडामोडींसाठी वाचत रहा!