(मुरुम प्रतिनिधी)

देशातील अग्रगण्य व ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या नवभारत टाईम्स, दिल्ली या वृत्तसंस्थेतर्फे दिला जाणारा उत्कृष्ट शिक्षण संस्था पुरस्कार आपल्या उमरगा येथील श्रमजीवी शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेला आज छत्रपती संभाजीनगर, महाराष्ट्र येथे प्रदान करण्यात आला.

हा मानाचा पुरस्कार महाराष्ट्र राज्याचे अक्षय ऊर्जा व दुग्धविकास मंत्री मा. ना. अतुलजी सावे व आमदार श्री. विक्रमजी काळे यांच्या हस्ते श्रमजीवी शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मा. श्री. रामकृष्णपंत खरोसेकर यांना भव्य सोहळ्यात प्रदान करण्यात आला. यावेळी आदर्श वरिष्ठ महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. श्री. राम सोलनकर, श्रमजीवी कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य श्री. राम पेठकर व तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.

१० सप्टेंबर १९८४ रोजी स्थापन झालेल्या या संस्थेने अत्यंत उल्लेखनीय व गौरवास्पद कामगिरी केलेली आहे. या पुरस्कारामुळे संस्थेच्या कार्यावर एक प्रकारे शिक्कामोर्तब झाले आहे, असे म्हणणे वावगे ठरणार नाही.

या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. विनायकराव पाटील व सरचिटणीस, माजी मंत्री मा. श्री. बसवराज पाटील यांनी प्राचार्य तसेच सर्व कर्मचारी वर्गाचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या:
“निर्भया पथकाला बालविवाह रोखण्यात यश; अल्पवयीन मुलीला मिळाले नवजीवन”    |    वडूजच्या विकासासाठी कोट्यवधींचा निधी; सहा महिन्यांत महत्त्वाची विकासकामे मार्गी – नगराध्यक्ष स्वप्नाली गोडसे    |    हिंगणी ग्रामपंचायत कार्यालयाला ग्रामस्थांनी ठोकले टाळे; ग्रामीण मार्ग क्र. १४४ च्या प्रश्नावरून संताप    |    आजचे राशीभविष्य.. 1 जून 2026..    |    म्हसवड येथील नगरवाचनालयात राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची ३०१ वी जयंती उत्साहात साजरी    |    म्हसवड पोलीसांचा दारु भट्टी वर छापा..    |    स्वच्छ बस स्थानक स्पर्धेत म्हसवड पुणे विभागात द्वितीय    |    आपली साथ आणि आशीर्वाद द्या- राजा माने    |    माणदेशी न्यूज - ताज्या घडामोडींसाठी वाचत रहा!