पुणे (प्रतिनिधि) : श्रीगोंदा तालुका, अहिल्यानगर जिल्ह्यातील ऐतिहासिक पेडगांव येथील किल्ले “धर्मवीरगडावर” (बहादुरगडावर ) तसेच गडावरील छत्रपती संभाजी महाराजांच्या “शौर्यस्थळास” भेट देणाऱ्या, विशेष कार्य करणाऱ्या व्यक्तींचा व शिव-शंभुभक्तांचा इथून पुढे शंभुपत्नी महाराणी येसुबाईंच्या ( स्वराज्यनिष्ठ श्रीमंत गणोजीराजे पिलाजीराजे शिर्के यांच्या ) वंशजांकडून महाराणी येसुबाईंची (शाहूमाता राजाऊंची ) व छत्रपती शंभुराजांची प्रतिमा भेट देऊन अनोख्या पद्धतीने स्वागत व सन्मान करण्याचा संकल्प केला आहे. या विशेष स्तुत्य उपक्रमाबद्दल राजेशिर्के घराण्याचे वंशज तथा राष्ट्रवादी माजी सैनिक सेलचे प्रदेशाध्यक्ष शंभुसेना प्रमुख दिपकराजे शिर्के व पत्रकार, इतिहास अभ्यासक, गडदुर्ग संवर्धक लक्ष्मीकांत राजेशिर्के यांचे कौतुक होत आहे.

 यापुढे किल्ले धर्मवीरगडावर भेट देणारे पत्रकार, सोशियल मीडिया चालक, इतिहास अभ्यासक, लेखक, गडदुर्ग संवर्धक, गडदुर्ग संवर्धन संस्था , पर्यावरण संस्था, सामाजिक संघटना , शिक्षण संस्था, शाळा, कॉलेज, कलाकार, अभिनेते , व्याख्याते, किर्तनकार, प्रबोधनकार, राजघराण्यातील वंशज मान्यवर, सरदार घराणे, व शूरवीर मावळ्यांच्या वंशजांसह शिव-शंभुभक्तांचा सन्मान करणार असल्याचे धर्मवीरगड संवर्धक लक्ष्मीकांत राजेशिर्के यांनी सांगितले. 
       या अनोख्या उपक्रमाचा प्रारंभ नुकताच राजेशिर्के यांचे वडिल तथा भिमा काठचा ढाण्या वाघ म्हणून परिचित असलेले राजेशिर्के घराण्याचे आदर्श व्यक्तिमत्व चेअरमन पै. कै. गणपतराव राजेशिर्के यांच्या पुण्यस्मरणाचे औचित्य साधात किर्तनकार ह.भ.प. सुखदेव महाराज ननवरे यांना स्वराज्यनिष्ठ श्रीमंत पिलाजीराजे शिर्के यांच्या राजकन्या तथा शिवस्नुषा, शंभुपत्नी महाराणी येसुबाई व छत्रपती थोरले शाहूराजांच्या राजमाता राजाऊंची प्रतिमा भेट देऊन अनोख्या उपक्रमाची सुरूवात केला आहे. किल्ले धर्मवीरगडावर येण्यापूर्वी व्याख्याते लक्ष्मीकांत गणपतराव राजेशिर्के मोबा. ९६२३६८४८९८ वर संपर्क साधावा. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या:
“निर्भया पथकाला बालविवाह रोखण्यात यश; अल्पवयीन मुलीला मिळाले नवजीवन”    |    वडूजच्या विकासासाठी कोट्यवधींचा निधी; सहा महिन्यांत महत्त्वाची विकासकामे मार्गी – नगराध्यक्ष स्वप्नाली गोडसे    |    हिंगणी ग्रामपंचायत कार्यालयाला ग्रामस्थांनी ठोकले टाळे; ग्रामीण मार्ग क्र. १४४ च्या प्रश्नावरून संताप    |    आजचे राशीभविष्य.. 1 जून 2026..    |    म्हसवड येथील नगरवाचनालयात राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची ३०१ वी जयंती उत्साहात साजरी    |    म्हसवड पोलीसांचा दारु भट्टी वर छापा..    |    स्वच्छ बस स्थानक स्पर्धेत म्हसवड पुणे विभागात द्वितीय    |    आपली साथ आणि आशीर्वाद द्या- राजा माने    |    माणदेशी न्यूज - ताज्या घडामोडींसाठी वाचत रहा!