रक्षक रयतेचा महिला सामाजिक फाउंडेशनच्या वतीने फलटण येथे महिलांसाठी भव्य रंगपंचमी कार्यक्रम उत्साहात पार


फलटण – रक्षक रयतेचा महिला सामाजिक फाउंडेशन फलटण यांच्यावतीने लायन्स क्लब फलटण, माळजाई मंदिर उद्यान समिती फलटण ,गगनगिरी ज्वेलर्स फलटण, इंद्राक्षी कलेक्शन फलटण आणि आर. एम.डी.ऑटो कार्पोरेशन फलटण यांच्या सहकार्याने माळजाई मंदिर परिसरात महिलांसाठी भव्य रंगपंचमी कार्यक्रम मोठ्या उत्साहात हजारो महिलांच्या उपस्थित पार पडला.
सदर रंगपंचमी कार्यक्रम हा फलटण मधील महिलांसाठी आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाची सुरुवात माळजाई उद्यान समितीचे चेअरमन प्रमोद निंबाळकर महेशशेठ गरवालिया, लायन्स नेत्र रुग्णालयाचे चेअरमन अर्जुनराव घाडगे, दिलीपराव शिंदे,स्वीकार मेहता, गगनगिरी ज्वेलर्सचे प्रमुख रवीशेठ शहाणे सामाजिक कार्यकर्ते मोहनराव पोतेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आली.
प्रमोद निंबाळकर यांनी लायन्स क्लब संचलित माळजाई उद्यान समितीच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. यापुढील काळात रक्षक रयतेचा महिला सामाजिक फाउंडेशनच्या सहकार्याने महिलांसाठी विविध कार्यक्रम राबविण्याची ग्वाही दिली.
यावेळी नैसर्गिक रंगांची उधळण महिलांनी डीजेच्या तालावर केली अनेकांनी वेगवेगळ्या प्रकारचे खेळ खेळले महिलांचा उत्साह प्रचंड होता. यावेळी सोना फलटणकर हिने उपस्थिती दर्शवून सर्व महिलांचा उत्साह आणखी वाढविला तसेच वेगवेगळ्या गाण्यांवर नृत्य केले.


रंगपंचमी कार्यक्रमात लकी ड्रॉ द्वारे हजारो रुपयांची बक्षिसे महिलांनी जिंकली. गगनगिरी ज्वेलर्स फलटण तर्फे तीन आकर्षक बक्षिसे, इंद्राक्षी कलेक्शन तर्फे चार पैठणी तसेच महिला दिनानिमित्त 25 स्वीट गिफ्ट लकी ड्रॉ द्वारे काढण्यात आले . कार्यक्रमास उपस्थित प्रत्येक महिलेला ज्येष्ठ उद्योजक हनुमंतराव मोहिते यांच्यातर्फे सुगंधी मसाले दुधाचे वाटप करण्यात आले . या कार्यक्रमास फलटण व पंचक्रोशीतील महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवीली. यावेळी आनंदी कन्सल्टन्सी वडूजचे चेतन चव्हाण,कृष्णाजी जाधव उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या:
प्राथमिक शिक्षक सह.बँक सातारा शाखा म्हसवड यांच्या वतीने म्हसवड कर्तृत्ववान महिलांचा सन्मान    |    पंढरपूर येथे शिक्षक परिषदेचा प्रशिक्षण वर्ग उत्साहात संपन्न    |    राज्यस्तरीय बसवरत्न पुरस्कार साठी प्रस्ताव पाठविण्याचे बसव प्रतिष्ठानचे आवाहन    |    बाल आनंद मेळावा आदर्श उपक्रम - सभापती विक्रम शिंगाडे    |    दुष्काळातून घडलेली माणसं… आज अधिकारी बनूनही आपुलकी कायम!    |    माणदेशी न्यूज - ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा आमचे चॅनल!