प्रामाणिकपणाचा आदर्श! सापडलेले ४० हजार रुपये परत करून विशाल भोईटे यांचे समाजापुढे प्रेरणादायी उदाहरण

वाघोली पुलाजवळ सापडलेली रक्कम मालकाला परत; वाठार पोलीस ठाण्याकडून सत्कार

पिंपोडे बुद्रुक /प्रतिनिधी /अभिजीत लेभे

आजच्या काळात हरवलेली वस्तू किंवा पैसा परत मिळणे ही दुर्मिळ गोष्ट मानली जाते. मात्र प्रामाणिकपणा अजूनही जिवंत असल्याचे सुंदर उदाहरण वाठार परिसरात पाहायला मिळाले.
वाघोली पुलाजवळ विशाल शिवाजीराव भोईटे (रा. वाघोली) यांना सुमारे ४० हजार रुपयांची रक्कम सापडली. ही रक्कम स्वतःकडे ठेवण्याचा मोह टाळत त्यांनी तत्काळ वाठार पोलीस ठाण्याशी संपर्क साधून प्रामाणिकपणाची ओळख करून दिली.
पोलीसांच्या मदतीने या पैशांचा खरा मालक ओंकार नंदकुमार बोबडे (रा. अनपटवाडी) यांचा शोध घेण्यात आला. त्यानंतर वाठार पोलीस स्टेशनमध्ये सर्वांच्या उपस्थितीत ही रक्कम बोबडे यांना परत करण्यात आली. अचानक हरवलेले पैसे परत मिळाल्याने बोबडे यांच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंद झळकत होता.
या प्रामाणिक कृतीबद्दल वाठार स्टेशन पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशील भोसले यांच्या हस्ते विशाल भोईटे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थितांनी त्यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक करत समाजातील तरुणांसाठी ते एक आदर्श असल्याचे सांगितले.
स्वार्थाच्या युगातही प्रामाणिकपणा आणि माणुसकी जपणारे लोक समाजात आहेत, याची जाणीव करून देणारी ही घटना वाठार परिसरात चर्चेचा विषय ठरत आहे. विशाल भोईटे यांच्या या कृतीमुळे समाजात सकारात्मक संदेश पोहोचला असून “प्रामाणिकपणा अजूनही जिवंत आहे” यावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या:
प्राथमिक शिक्षक सह.बँक सातारा शाखा म्हसवड यांच्या वतीने म्हसवड कर्तृत्ववान महिलांचा सन्मान    |    पंढरपूर येथे शिक्षक परिषदेचा प्रशिक्षण वर्ग उत्साहात संपन्न    |    राज्यस्तरीय बसवरत्न पुरस्कार साठी प्रस्ताव पाठविण्याचे बसव प्रतिष्ठानचे आवाहन    |    बाल आनंद मेळावा आदर्श उपक्रम - सभापती विक्रम शिंगाडे    |    दुष्काळातून घडलेली माणसं… आज अधिकारी बनूनही आपुलकी कायम!    |    माणदेशी न्यूज - ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा आमचे चॅनल!