कारखेल येथे शिवजयंती उत्साहात साजरी,सोहम शिर्के यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रम

म्हसवड प्रतिनिधी
पावन भूमी सरसेनापती संताजी घोरपडे समाधी स्थळी शिवजयंतीचा अभूतपूर्व भव्य सोहळा संपन्न झाली.

माण तालुक्यातील ऐतिहासिक व पावन भूमी असलेल्या सरसेनापती संताजी घोरपडे समाधी स्थळी छत्रपती शिवाजी महाराज जयंती अत्यंत उत्साहात, दिमाखात आणि जल्लोषपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. संपूर्ण परिसर भगवामय झाला होता आणि “जय भवानी, जय शिवाजी”च्या घोषणांनी वातावरण दुमदुमून गेले.

मा. ना. महादेव जानकर साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमुळे कार्यक्रमास विशेष उंची प्राप्त झाली. त्यांच्या उपस्थितीने सोहळ्याला चार चांद लागले. यावेळी आयोजित करण्यात आलेली विद्यार्थ्यांची वक्तृत्व स्पर्धा अत्यंत रंगतदार ठरली. स्पर्धकांनी शिवचरित्र, स्वराज्य आणि संताजी घोरपडे यांच्या पराक्रमावर प्रभावी व ओजस्वी भाषणे सादर करून उपस्थितांची मने जिंकली.

यानंतर पार पडलेला बक्षीस वितरण सोहळा मोठ्या थाटामाटात आणि उत्साहात संपन्न झाला. मान्यवरांनी आपल्या भाषणातून शिवरायांचे राष्ट्रनिर्माणातील योगदान, स्वाभिमान आणि प्रेरणादायी विचार अधोरेखित केले. तसेच सरसेनापती संताजी घोरपडे यांच्या शौर्यगाथेची उजळणी करत या पावन स्थळाच्या विकासाची गरज अधोरेखित केली.

शिवप्रेरणा – सरसेनापती संताजी घोरपडे शिवजयंती उत्सव समिती, माण चे अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते सोहम शिर्के यांनी आपल्या मनोगतात ठाम भूमिका मांडताना सांगितले,

“ही शिवजयंती साजरी करण्याचे पहिले वर्ष आहे. या समाधी स्थळाचा सर्वांगीण विकास होईपर्यंत आमचा लढा सुरूच राहील. पुढील वर्षी शिवजयंती आणखी मोठ्या प्रमाणावर, अधिक भव्य आणि ऐतिहासिक स्वरूपात साजरी करू.”
कार्यक्रमास परिसरातील नागरिक, युवक-युवती, महिला आणि शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण वातावरण शिवमय, प्रेरणादायी आणि अभिमानाने भारलेले होते.

ताज्या बातम्या:
कारखेल येथे शिवजयंती उत्साहात साजरी, सोहम शिर्के यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *