सोलापूर जिल्ह्यातील कोरडा दुष्काळग्रस्त ११तालुक्यातील विद्यार्थांचे शैक्षणिक व परीक्षा शुल्क माफ करावी- शिवस्वराज्य युवा संघटनेची मागणी पंढरपूर प्रतिनिधी,शासनाने नुकताच राज्यातील २६५ तालुक्यांमध्ये कोरडा दुष्काळ जाहीर केलेला आहे.त्यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील ११तालुके दुष्काळ जाहीर करण्यात आले आहेत.तसेच सोलापूर जिल्ह्यातील ११ तालुक्यातील दुष्काळग्रस्त भागातील प्रत्येक खेडे गावांमध्ये सध्याची परिस्थिती अत्यंत बिकट झालेली असून पालकांकडे कोणताही आर्थिक स्त्रोत उपलब्ध नाही.सरकारच्या मदतीने शेतकरी आपल्या जनावरे,गाय,बैल यांना चांगल्याप्रकारे संभाळ करतील,आणि शेतकरी आपल्या परिवाराचा सुखाणी जगले, तसेच यावर्षी सोलापूर जिल्ह्यातील तूर,कांदा,भुईमुग,केळी ज्वारी,बोर, असे अनेक गोष्टींचे होऊन पिके करपून गेली आहेत.खरीप हंगामातील पिके पावसाअभावी उन्हात जळून गेली आहेत,महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोरडा दुष्काळ जाहीर करताना म्हटले होते की सोलापूर जिल्ह्यातील सर्व विद्यार्थ्यांची शैक्षणिक फि माफ करण्यात येईल ते फक्त तोंडी बोले होते.त्यामुळे दुष्काळग्रस्त भागातील सर्व विद्यार्थी व विद्यार्थींनीचे सन २०२६-२७या शैक्षणिक वर्षातील व परीक्षा शुल्क माफ करण्याबाबत तातडीने शासनाने जीआर (आदेश) काढावा.संबंधित विद्यापीठे,एसएससी बोर्ड आणि सर्व शाळा महाविद्यालयांना कळविण्यासाठी संबंधितांना आदेशित करावे.सोलापूर जिल्ह्यातील कोरडा दुष्काळग्रस्त ११तालुक्यातील शैक्षणिक आणि परीक्षा शुल्क माफ करून जिल्ह्यातील सर्व विद्यार्थ्यांना दिलासा देणात यावा अशी मागणी शिवस्वराज्य युवा संघटनेच्यावतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उच्च तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील व शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे साहेब यांच्याकडे केली आहे अशी माहिती शिवस्वराज्य युवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदीपराजे मुटकुळे-पाटील यांनी दिली Post navigation पंढरपूरमध्ये सहा दिवसीय मोफत आरोग्य शिबिराला उत्साहात सुरुवात; पहिल्याच दिवशी रुग्णांचा उस्फूर्त प्रतिसाद पिंपोडे बुद्रुक येथे राजकीय वादाचे पडसाद शाळेत; उपसरपंचांकडून राजकीय दबावाचा वापर.