जिल्हा परिषद सदस्य किरण पांढरे यांच्या प्रयत्नामुळे कोळा जिल्हा परिषद गटात 21 नवनियुक्त शिक्षकांची नेमणूक…


सांगोला प्रतिनिधी
सोलापूर जिल्हा परिषद मध्ये शिक्षक भरती मध्ये पात्र असलेले 349 शिक्षकांपैकी 344 नवनियुक्त शिक्षकांना सोलापूर जिल्हा मध्ये रुजू होण्याचे जिल्हा परिषदेने आदेश दिले, परंतु सांगोला तालुक्यासाठी 70 नवनियुक्त शिक्षकांची नियुक्ती झाली व यामध्ये कोळा जिल्हा परिषद गटात 21 शिक्षक खेचून आणण्यात जिल्हा परिषद सदस्य किरण भाऊ पांढरे यांना यश आले, त्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
कोळा केंद्र
जि.प. प्रा. शाळा कोळा मुली.. एक शिक्षक
जि.प. प्रा. शाळा देशमुख वस्ती.. दोन शिक्षक
जि.प. प्रा. पांढरे करांडे वस्ती.. एक शिक्षक
जि.प. प्रा. गडदे पांढरे वस्ती.. एक शिक्षक
जि.प. प्रा,. शाळा आलदर वस्ती.. एक शिक्षक
जि.प. प्रा. शाळा अनवाणे वस्ती.. एक शिक्षक
किडबिसरी केंद्र
जि.प. प्रा. शाळा किडी बिसरी.. दोन शिक्षक
जि.प. प्रा. करचे काबुगडे वस्ती.. एक शिक्षक
जि.प. प्रा. शाळा तिप्पेहाळी.. एक शिक्षक
जि.प. प्रा. शाळा पाचेगाव.. एक शिक्षक
जि.प. प्रा. शाळा काळू बाळू वाडी.. दोन शिक्षक
हातीद केंद्र
जि.प. प्रा. शाळा जुजारपूर… दोन शिक्षक
जि.प. प्रा. शाळा जुनोनी… दोन शिक्षक
जि.प. प्रा. शाळा हटकर मंगेवाडी… एक शिक्षक
जि.प. प्रा. शाळा गुणापवाडी… एक शिक्षक
जि.प. प्रा. शाळा घाडगे मळा… एक शिक्षक
_________________________


नवनियुक्त शिक्षकांमुळे कोळा पंचक्रोशीतील शैक्षणिक दृष्ट्या मुलांचा दर्जा वाढेल व बंद पडलेल्या मराठी शाळेंना पुनर्जीवन मिळून नव संजीवनी प्राप्त होईल. यासाठी सांगोला तालुक्याचे लोकप्रिय आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांचे मार्गदर्शन लाभले असून, जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य सभापती चेतन सिंह केदार यांचे सहकार्य मिळाले.
मा. किरण भाऊ पांढरे
जिल्हा परिषद सदस्य

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *