….

भाग्यांक आणि मूलांक 1 असणाऱ्यांचे संपूर्ण भविष्य*

ज्यांचा जन्म 1, 10, 19, 28 तारखेला झाला आहे किंवा ज्यांचा पूर्ण बेरीज 1 येते त्यांच्यासाठी –

1. स्वभाव कसा असतो –
हा माणूस राजा सारखा जगतो. कोणाच्या हाताखाली काम करणार नाही. स्वाभिमान खूप जास्त. तोंडावर स्पष्ट बोलतो, त्यामुळे लोकांना वाटतं हा गर्विष्ठ आहे. पण मनाने खूप चांगला आणि मदत करणारा. एकट्याने मोठं साम्राज्य उभं करतो.

2. आजार कोणते होतात –
1 नंबर सूर्याचा आहे. म्हणून यांना हृदय, डोळे, डोकेदुखी, हाडांचे त्रास होतात. BP हाय होणे, मायग्रेन, डोळ्यांचा चष्मा लवकर लागणे. उन्हात जास्त फिरल्याने त्रास होतो. रागामुळे स्वतःचेच नुकसान करून घेतात.

3. मित्र आणि शत्रू –
यांचे मित्र 2, 3, 5, 9 नंबर वाले असतात. 8 नंबर (शनी) वाल्यांशी यांचे कधीच पटत नाही. कारण सूर्य आणि शनी हे बाप-बेटा असूनही शत्रू आहेत.

4. कुटुंब –
घरात यांचेच चालते. वडिलांशी किंवा मोठ्या भावाशी थोडे वाद होतात. पण कुटुंबाची पूर्ण जबाबदारी हेच घेतात. मुलं यांचा खूप आदर करतात, पण बायकोला यांचा हट्टीपणा आवडत नाही.

5. शिक्षण आणि नोकरी –
शिक्षणात हुशार, पण एका जागी लक्ष लागत नाही. IAS, IPS, डॉक्टर, इंजिनिअर, नेता, बिल्डर, सरकारी नोकरीत मोठे पद यांना मिळते. नोकरीपेक्षा स्वतःचा व्यवसाय, राजकारण, समाजसेवेत हे टॉपला जातात.

6. जोडीदार / लग्न –
यांना सुंदर आणि हुशार जोडीदार मिळतो. पण “मीच खरा” या स्वभावामुळे लग्नात भांडणं होतात. यांनी जोडीदाराचे ऐकायला शिकले पाहिजे. नाहीतर 2 लग्नाचा योग बनतो.

7. यश कधी मिळते –
यांचे नशीब वयाच्या 22 नंतर चमकते. 28, 35, 41 व्या वर्षी मोठं यश मिळते. आयुष्यात पैसा, गाडी, बंगला सगळं कमावतात, पण उशिरा.

8. अपयश कधी येते –
जास्त अहंकार, दुसऱ्याचा अपमान करणे, आणि रागाच्या भरात घेतलेले निर्णय यामुळेच हे लोक पडतात.

उपाय –

  1. रोज सकाळी तांब्याच्या भांड्याने सूर्याला पाणी द्या आणि “ओम सूर्याय नमः” 11 वेळा बोला.
  2. वडिलांचा आणि सूर्याचा कधीच अपमान करू नका.
  3. रविवारी गहू, गूळ आणि तांबे दान करा.
  4. लाल आणि केशरी रंग जास्त वापरा.
    ….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *