सिद्धनाथ मंदिरासमोर मान्यवरांच्या हस्ते शाल-श्रीफळ देऊन सत्कार म्हसवड : माण तालुका शिक्षक समितीच्या सरचिटणीसपदी सुशील त्रिगुणे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा म्हसवड येथे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. म्हसवड येथील सिद्धनाथ मंदिरासमोर झालेल्या या सत्कार समारंभास म्हसवडचे माजी नगराध्यक्ष भगतसिंग ऊर्फ तुषार विरकर, क्रांतिवीर शैक्षणिक संकुलाचे अध्यक्ष व कृषिरत्न प्रा. विश्वंभर बाबर, माजी नगरसेवक कैलास भोरे, माजी नगरसेवक विकास गोंजारी, ज्येष्ठ नेते वसंतराव शिर्के, युवा नेते दाऊद मुल्ला तसेच भुसार व्यापारी महादेव माने आदी उपस्थित होते. यावेळी मान्यवरांनी सुशील त्रिगुणे यांचे अभिनंदन करून शिक्षकांच्या विविध प्रश्नांसाठी तसेच शैक्षणिक क्षेत्राच्या विकासासाठी त्यांच्या कार्यास शुभेच्छा दिल्या. शिक्षक समितीच्या माध्यमातून शिक्षकांचे प्रश्न प्रभावीपणे मांडून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी त्रिगुणे निश्चितच प्रयत्न करतील, असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला. सत्काराला उत्तर देताना सुशील त्रिगुणे यांनी सर्वांचे आभार मानले. शिक्षकांच्या हितासाठी तसेच विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी प्रामाणिकपणे कार्य करण्याची ग्वाही त्यांनी दिली. Post navigation युवकांच्या पाठपुराव्याला यश! खराडेवाडी स्मशानभूमीच्या सुशोभीकरणाचा प्रश्न मार्गी; काँक्रिटीकरणाच्या कामाला आमदार सचिन पाटील यांच्याकडून निधी मंजूर श्री विठ्ठलसाईचे रोलर पुजन आ. बसवराज पाटील यांच्या हस्ते संपन्न