म्हसवड (प्रतिनिधी):शाळेतून घरी येणाऱ्या एका अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून तिची छेड काढणे, अश्लील हावभाव करणे आणि धमकावणे प्रकरणी पळशी (ता. माण) येथील एका तरुणाविरुद्ध म्हसवड पोलीस ठाण्यात बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह (पोक्सो) विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, श्रीशैल्य मोहन खाडे (रा. पळशी, ता. माण, जि. सातारा) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने म्हसवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. नेमकी घटना काय? दिनांक २१ जुलै २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ५:०० वाजण्याच्या सुमारास पीडित अल्पवयीन मुलगी शाळेतून पळशी येथील सरकारी दवाखान्यापुढील रस्त्याने घरी जात होती. त्यावेळी संशयित आरोपी श्रीशैल्य खाडे हा दुचाकीवरून तेथे आला. त्याने मुलीला “गाडीवर बस” असे सांगत तिचा हात धरून ओढले. तसेच अश्लील हावभाव करून तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. या घटनेची माहिती घरी दिल्यास गंभीर परिणाम भोगण्याची धमकी देऊन तो तेथून पसार झाला.त्यानंतर, दिनांक २७ जुलै २०२६ रोजी रात्री १:३० वाजण्याच्या सुमारास फिर्यादी व त्यांचे कुटुंब घरासमोरील अंगणात झोपले असताना आरोपी पुन्हा त्यांच्या घरासमोर आला. त्याने दुचाकीचा हॉर्न वाजवून, अश्लील हावभाव करत मुलीबाबत चौकशी केली आणि तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करून पळून गेला. पोलीस कारवाई या त्रासाला कंटाळून पीडितेच्या आईने म्हसवड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यावरून पोलिसांनी संशयित आरोपी श्रीशैल्य खाडे याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) ७९, ३५१(२) तसेच बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम (POCSO) कलम ११ व १२ अन्वये गुन्हा (गु.र.नं. २०८/२०२६) दाखल केला आहे.या प्रकरणाचा पुढील तपास म्हसवड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक (सपोनि) पोमण करत आहेत. Post navigation पंढरपुर येथे धर्माचार्य सभा… पंढरपूर तालुक्यातील मायनर व तलाव भरून मिळावे.नगराध्यक्षा,डॉ.प्रणिता भगीरथ भालके