जीवनात आधुनिकतेचा स्वीकार करा -डॉ. यु.डी. चव्हाण म्हसवड…..प्रतिनिधीस्पर्धेच्या जगात टिकून राहण्यासाठी व त्यातून आपलं अस्तित्व निर्माण करण्यासाठी जीवनात नेहमी आधुनिकतेचा स्वीकार करून स्वतःचे अस्तित्व सिद्ध करा असे आवाहन राहुरी कृषी विद्यापीठाचे माजी प्रभारी कुलगुरू तसेच कृषी महाविद्यालय फलटणचे प्राचार्य डॉ. यु. डी. चव्हाण यांनी म्हसवड येथे केले. म्हसवड येथील क्रांतिवीर ज्युनियर कॉलेज म्हसवड येथे विद्यार्थी मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित केला होता. अध्यक्षस्थानी संस्था अध्यक्ष कृषिरत्न प्रा. विश्वंभर बाबर होते . विशेष पाहुणे म्हणून प्राचार्य डॉ. यु डी. चव्हाण, राहुरी कृषी विद्यापीठाच्या पशुसंवर्धन व दुग्धशास्त्रीय विभागाचे माजी विभाग प्रमुख डॉ. उद्धवराव भोईटे, डॉ. संगीता भोईटे, कृषी अधिकारी दिलीप पवार इत्यादी मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना प्राचार्य यु डी चव्हाण म्हणाले सध्याचे जग हे जीव घेण्या स्पर्धेचे जग असून जो शैक्षणिकदृष्ट्या अपडेट राहील तोच यशस्वी होणार आहे. नेहमी सकारात्मक रहा, वेळेचे नियोजन करा, नियमित अभ्यास करा, तसेच अभ्यासाबरोबर खेळायला महत्व द्या. तुम्ही कोणतेही क्षेत्रात जावा मात्र आवडीचा मार्ग निवडा. आपला कल विचारात घेऊन वाटचाल करा. कौशल्य युक्त शिक्षण ही काळाची गरज असल्याचे प्राचार्य चव्हाण यांनी स्पष्ट केले. यावेळी बोलताना डॉ. उद्धवराव भोईटे म्हणाले विद्यार्थ्यांनो क्रांतिवीर शैक्षणिक संकुलाच्या माध्यमातून तुम्हाला खूप चांगली शैक्षणिक संधी उपलब्ध झालेले आहे. या संधीचा फायदा घ्या. उपक्रमशीलतेचा वसा आणि वारसा जपणाऱ्या क्रांतिवीर संकुलास उज्वल भविष्य असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. आई वडील व गुरुजनाचा आदर ठेवून त्यांचे नाव उज्वल करण्याबाबत डॉ. भोईटे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी बोलताना डॉ. संगीता भोईटे म्हणाल्या शालेय जीवनापासूनच गणित व संख्याशास्त्राची मैत्री करा. तुमच्या जीवनाचे गणित उलगडण्यासाठी तुम्हाला गणित आणि संख्याशास्त्र विषय महत्त्वाचा आहे. गणित विषयाबाबत नकारात्मक राहण्याऐवजी सकारात्मक दृष्टीने या विषयाबरोबर पहिल्यापासूनच मैत्री करून क्लुप्त्या समजून घेण्याचे आवाहन डॉ. संगीता भोईटे यांनी केले. प्रस्ताविक संस्था अध्यक्ष कृषिरत्न विश्वंभर बाबर यांनी करून संस्थेच्या उपक्रमशीलतेची व व्यवस्थापनाची माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पीक शस्त्र विषयाच्या शिक्षिका रत्नश्री चंदुरे यांनी केले तर उपस्थित यांचे आभार प्राचार्य विठ्ठल लवटे आणि व्यक्त केले. Post navigation श्री सर्वजन ट्रस्टच्या वतीने वारकऱ्यांना मोफत फाराळ वाटप गुरुपौर्णिमा महोत्सवानिमित्ताने शालेयविद्यार्थ्यांना मोफत वह्या -पेन वाटप