माण प्रतिनिधी न्यूजमाणदेशातील दोन रत्नांचा सुवर्णसंगम!सातारा डेप्युटी RTO पदी गजानन ठोंबरे साहेबांची पदोन्नती; दहिवडीत चैतन्य करिअर अकॅडमीमध्ये भव्य नागरी सत्कार सोहळा संपन्न झाला. ”नसे रागरंग, नसे उच्च वास्तू, तरीही कष्टाने यशाचा गड जिंकता येतो!” अकॅडमीच्या मंचावरून खाडे सरांनी व्यक्त केली कृतज्ञता.आयकर आयुक्त डॉ. नितीन वाघमोडे व डेप्युटी RTO गजानन ठोंबरे यांच्याकडून चैतन्य अकॅडमीच्या शिस्तीचे आणि निसर्गरम्य परिसराचे कौतुक.पर्यावरणपूरक संदेश: सर्व उपस्थितांना ‘आम्रवृक्ष’ (आंब्याचे रोप) भेट देऊन अनोखा सन्मान.दहिवडी (प्रतिनिधी):”मनात जर जिद्द आणि प्रामाणिकपणा असेल, तर कर्तृत्वाचे सोनेरी पाऊल नक्कीच पडते!”याचीच प्रचिती नुकतीच दहिवडी नगरीत पाहायला मिळाली. माण तालुक्याचे सुपुत्र मा. श्री. गजानन ठोंबरे साहेब यांची ‘सातारा डेप्युटी RTO’ पदी सन्मानपूर्वक पदोन्नती झाल्याबद्दल, त्यांच्या दैदिप्यमान प्रवासाचा आणि कर्तृत्वाचा गौरव करण्यासाठी दहिवडी येथील चैतन्य करिअर अकॅडमी (सैन्य व पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण केंद्र) येथे रविवार, दिनांक २१ जून २०२६ रोजी एका भव्य आणि ऐतिहासिक नागरी सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.हा सोहळा अत्यंत उत्साहात, भावुक आणि मराठी संस्कृतीला साजेसा दिमाखात संपन्न झाला.या सोहळ्यासाठी प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र राज्याचे आयकर आयुक्त (इन्कम टॅक्स कमिशनर) मा. श्री. डॉ. नितीन वाघमोडे साहेब लाभले होते. एकाच मंचावर प्रशासनातील दोन उच्चपदस्थ सनदी अधिकाऱ्यांना पाहणे, हा संपूर्ण माण-खटाव तालुक्यासाठी आणि विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्णयोग ठरला.व्यासपीठावर माननीय प्राध्यापक विक्रम शिंगाडे (सभापती, पंचायत समिती माण), माजी सहाय्यक निबंधक धनाजी खाडे भारतीय जैन संघटनेचे अध्यक्ष व प्रसिद्ध उद्योजक भरतेसशेठ गांधी नंदकुमार खोत, माजी सनदी अधिकारी नारायण ढोले साहेब आणि पाणी फाउंडेशनचे समन्वयक अजित पवार डॉक्टर प्रदीप पोळ सुरेश जगदाळे सुभाष पवार ज्येष्ठ नेते चंद्रकांत खाडे बापू विकास गायकवाड संस्कार पवार आयुष खाडे सक्षम पवार आदी मान्यवर उपस्थित होते.आई-वडिलांचे स्वप्न साकारून राष्ट्रसेवा करा: डॉ. नितीन वाघमोडेयाप्रसंगी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना इन्कम टॅक्स कमिशनर डॉ. नितीन वाघमोडे भावूक स्वरात म्हणाले की,”ग्रामीण भागातील होतकरू विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षा, पोलीस आणि सैन्य दलात अधिकारी होऊन आपल्या आई-वडिलांचे स्वप्न साकार करावे. आपल्या गावाचे आणि भागाचे नाव उंच करून देशसेवा म्हणजेच राष्ट्रसेवा करावी. परिस्थिती कशीही असो, जर मनात जिद्द असेल तर ग्रामीण भागातील तरुणही यशाचे सर्वोच्च शिखर गाठू शकतो, हे ठोंबरे साहेबांनी दाखवून दिले आहे.”पुढे बोलताना त्यांनी चैतन्य करिअर अकॅडमीच्या शिस्तबद्ध वातावरणाचे आणि निसर्गरम्य परिसराचे कौतुक केले. अकॅडमीचे विद्यार्थी अत्यंत शिस्तप्रिय (डिसिप्लिन) आहेत, असे गौरवोद्गार त्यांनी काढले. तसेच, “इथे आलेला प्रत्येक नागरिक आणि कार्यकर्ता हा केवळ माणूस नसून एक अनमोल हिरा आहे,” अशा शब्दांत त्यांनी दहिवडीचे ग्रामस्थ, हरित वसुंधरा, पाणी फाउंडेशन, आप्पा नाना संघटना आणि आर्ट ऑफ लिव्हिंगच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या सामाजिक कार्याची पाठ थोपटली व वृक्ष संवर्धनाचा मोलाचा संदेश दिला.खाडे सरांचे आणि अकॅडमीचे कार्य कौतुकास्पद: डेप्युटी RTO गजानन ठोंबरेसत्कारमूर्ती सातारा डेप्युटी RTO गजानन ठोंबरे यांनी आपल्या सत्कारानंतर कृतज्ञता व्यक्त करताना सांगितले की,”माझ्या स्वतःच्या भागात, माझ्याच गावात एवढी मोठी आणि दर्जेदार अकॅडमी चालवली जात आहे, याचा मला सार्थ अभिमान आहे. अकॅडमीमधील कठोर शिस्त पाहून मला शंभर टक्के खात्री आहे की येथील सर्व विद्यार्थी स्पर्धा परीक्षेत यशस्वी होतील.”त्यांनी अकॅडमीचे संचालक खाडे सर आणि त्यांच्या टीमच्या सामाजिक कार्याचे विशेष कौतुक केले. तसेच ग्रामदैवत श्री ब्रह्मचैतन्य महाराज आणि शंभू महादेवाच्या चरणी अकॅडमीच्या सर्व विद्यार्थ्यांच्या यशासाठी प्रार्थना करत विद्यार्थ्यांना आशीर्वाद दिला आणि भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.मान्यवरांचे मनोगत आणि शुभेच्छायावेळी माजी सहाय्यक निबंधक धनाजी खाडे, उद्योजक भरतेशशेठ गांधी , नंदकुमार खोत आणि पाणी फाउंडेशनचे समन्वयक अजित पवार यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. त्यांनी अकॅडमीच्या विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि सत्कारमूर्ती गजानन ठोंबरे साहेब यांना त्यांच्या भावी वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाचे प्रास्ताविक आप्पासाहेब देशमुख यांनी केले. त्यांनी उपस्थित सर्व पाहुण्यांचे स्वागत करून कार्यक्रमाचा हेतू अत्यंत नेटका स्पष्ट केला.चैतन्य अकॅडमीकडून ‘आम्रवृक्ष’ देऊन पर्यावरणपूरक सत्कारया सोहळ्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे, केवळ हार-तुरे न देता, चैतन्य अकॅडमीच्या वतीने उपस्थित सर्व मार्गदर्शक, पदाधिकारी, माध्यम प्रतिनिधी आणि मान्यवरांना वृक्ष संवर्धनाचा संदेश देत यथोचित ‘आम्रवृक्ष’ (आंब्याचे रोप) भेट देऊन अत्यंत अनोखा आणि पर्यावरणपूरक सन्मान करण्यात आला.खाडे सरांचे भावुक आभार प्रदर्शन:कार्यक्रमाच्या शेवटी संदीप खाडे सर यांनी उपस्थितांचे आभार मानताना एक सुंदर चारोळी सादर केली:”आलो आपण सर्वांनी देऊनी आपला बहुमूल्य वेळ,तुमच्याच उपस्थितीने जमला या सोहळ्याचा सुंदर मेळ!ऋण व्यक्त करतो आम्ही आज मनापासून सर्वांचे,हेच नाते सदैव राहावे आपुलकीचे अन् विश्वासाचे!”आभार मानताना खाडे सर पुढे म्हणाले की, “आज आपल्या या भागाचे दोन अनमोल रत्न एकत्र आले आहेत. डॉ. नितीन वाघमोडे साहेब हे देशाच्या उच्च पदावर (आयकर आयुक्त) कार्यरत असून त्यांनी आपल्या देशाचे व माणदेशाचे नाव उंचावले आहे, तर गजानन ठोंबरे साहेबांनी डेप्युटी RTO होऊन माण तालुक्याची मान अभिमानाने वर केली आहे.” त्यांनी अत्यंत विनम्रतेने प्रमुख अतिथी, सत्कारमूर्ती, सर्व आयोजक संस्था आणि रविवारची सुट्टी असूनही प्रचंड संख्येने उपस्थित राहिलेल्या समस्त दहिवडी ग्रामस्थांचे, माता-भगिनींचे आणि पत्रकार बांधवांचे ऋण व्यक्त केले.यांची लाभली प्रमुख उपस्थिती:या भव्य सोहळ्यासाठी माजी सरपंच (पेडगाव) अंकुशराव दबडे, सेवानिवृत्त तहसीलदार नारायणराव ढोले, सुगंधराव यादव, विकास गायकवाड, सुभाष पवार, कारंडे काका, राष्ट्रीय समाज पक्षाचे संदीप खरात शेतकरी संघटनेचे राजेंद्र मुळीकडॉक्टर प्रदीप पोळ,सुरेश जगदाळे जाशी गावचे ज्येष्ठ नेते चंद्राहार खाडे बापूतसेच पत्रकार रुपेश कदम, अभिजीत अवघडेयासह अकॅडमीचे गुणवंत विद्यार्थी दत्तात्रेय दबडे CRPFमधुकर ठोंबरे मुंबई पोलीस यांच्यासह चैतन्य करिअर अकॅडमी परिवार, समस्त ग्रामस्थ दहिवडी, आप्पा नाना फाऊंडेशन, पाणी फाऊंडेशन, आर्ट ऑफ लिव्हिंग टीम आणि हरित वसुंधरा माण-खटावचे सर्व पदाधिकारी, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. Post navigation यापुढील काळात महाराष्ट्र शत प्रतिशत भाजप झाल्याशिवाय राहणार नाही – आमदार बसवराज पाटील उपवर्गीकरण विरोधी मुंबईतील दि: 30 जून रोजी महामोर्चासाठी सातारकर सज्ज…