जेष्ठ किर्तनकार कै.आनंदराव लेंभे (शास्त्रीनाना)यांचे द्वितीय पुण्यस्मरण दिनानिमित्त शुक्रवारी पिंपोडे बुद्रुक येथे भजन स्पर्धा

पिंपोडे बुद्रुक/ प्रतिनिधी/ अभिजीत लेंभे

   ब्रह्मचैतन्य महाजनी महाराज यांचे परमशिष्य व जेष्ठ किर्तनकार वैकुंठवासी ह.भ.प.आनंदराव लेंभे ( शास्त्री नाना ) यांचे द्वितीय पुण्यस्मरण दिनानिमित्त पिंपोडे बुद्रुक ( तडवळे रोड) ता.कोरेगाव येथे दि.१९ व दि.२० रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
     शुक्रवार दि.१९ रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत ह.भ.प.मदनराव कदम सर यांचे अधिपत्याखाली भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.शास्त्रीनाना यांनी आयुष्यभर वारकरी संप्रदाय वाढविण्यासाठी भजन,किर्तन,हरिनाम सप्ताह, ज्ञानेश्वरी पारायण या माध्यमातून प्रयत्न केले.त्यांचे द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त ग्रामीण भागातील तरुणांना भजन,किर्तनाची आवड निर्माण व्हावी या उद्देशाने लेंभे कुटुंबियांनी भजन स्पर्धेचे आयोजन केले आहे.भजन मंडळात कमीतकमी ७ सदस्यांचा सहभाग असावा व स्पर्धेत भाग घेणारी मंडळी ही कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागातील सोळशी ते पळशी या क्षेत्रातील असणे आवश्यक आहे.विजेत्या भजन मंडळास प्रथम, द्वितीय , तृतीय क्रमांकास अनुक्रमे २१००० रूपये,१५००० रुपये,१०००० रूपये बक्षीस व स्मृतिचिन्ह देण्यात येणार आहे.प्रोत्साहनपर ५००० रूपयेचे बक्षीस दिले जाणार आहे.सहभागी भजन मंडळास प्रमाणपत्र व रूपये ५०० दिले जाणार आहेत.भाग घेणाऱ्यांना प्रवेश फी नाही.भजन मंडळाने शक्यतो वारकरी पोशाखामध्ये यावे.सायंकाळी ७ ते ८ वाजता हरिपाठ होईल.
    वै.ह.भ.प.आनंदराव लेंभे ( शास्त्रीनाना) यांचे द्वितीय पुण्यस्मरणनिमित्त शनिवार दि.२० रोजी पहाटे ४ ते ६ काकडआरती, सकाळी ९ ते १० भजन स्पर्धेचा  बक्षीस वितरण समारंभ होणार आहे.सकाळी १० ते १२ वाजता ह.भ.प.युवकमित्र बंडातात्या कराडकर यांचे फुलाचे किर्तन होणार आहे.ज्ञानोबाराय अध्यात्मिक गुरूकूल सोळशी व पंचक्रोशीतील भजन मंडळांची किर्तन साथ मिळणार आहे.दुपारी १२ ते ३ भोजन समारंभ होणार आहे.तरी सर्वांनी या कार्यक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन लेंभे परिवारातर्फे करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

...
ताज्या बातम्या:
जेष्ठ किर्तनकार कै.आनंदराव लेंभे (शास्त्रीनाना)यांचे द्वितीय पुण्यस्मरण दिनानिमित्त शुक्रवारी पिंपोडे बुद्रुक येथे भजन स्पर्धा    |    कृतज्ञता सोहळ्यात शिंदे परिवाराकडून विद्यार्थ्यांना भेटवस्तूचे वाटप…    |    साताऱ्यात सकल मातंग समाजाचा उपवर्गीकरणासाठी मोर्चा.    |    मायणी येथे नवागतांचे अभूतपूर्व स्वागत    |    खानापुर येथील संत निरंकारी मंडळाच्या रक्तदान शिबिरासउत्स्फूर्त प्रतिसाद; १२७ रक्तदात्यांचा सहभाग    |    माणगंगा शैक्षणिक संकुलात नवीन शैक्षणिक वर्ष 2026-27 चा प्रवेशोत्सव उत्साहात साजरा    |    रिपब्लिकन सेनेच्या सातारा जिल्हा पदाधिकारी दि: २१ जून रोजी निवडी..    |    इरफान ने देवदूताची भूमिका बजावली,त्याची शौर्य पदकासाठी शिफारस व्हावी.    |    माणदेशी न्यूज - ताज्या घडामोडींसाठी वाचत रहा!