सातारा वृत्तसेवा .

: स्पर्धेच्या युगात कायदेशीर बाबींची काळजी घेत सभासदांच्या हितार्थ पतसंस्थानी पारदर्शक कारभार केला पाहिजे.तरच यश मिळू शकते.असे प्रतिपादन अभिजीत पाटील यांनी केले.
येथील आनंदराव चव्हाण ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्या द्वितीय वर्धापनदिन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.तेव्हा चेअरमन अभिजीत (दादा) हिंदुराव पाटील बोलत होते.यावेळी विविध संघटनांच्यावतीने पुष्पगुच्छ देऊन पाटील यांना शुभेच्छापर सत्कार केला. यावेळी गणेश मारुती साबळे, सौ.वैष्णवी अभिजित जाधव, प्रताप शिवाजी गायकवाड, महाराष्ट्र बँकेचे माजी अधिकारी दादासाहेब केंगार व बी.एल. माने,पुरोगामी चळवळीचे नेते राऊत,ज्येष्ठ नेते वसंत गंगावणे, समितीचे उपाध्यक्ष माणिक आढाव,बंधुत्व प्रतिष्ठानचे संस्थापक अनिल वीर आदी विविध क्षेत्रातील मान्यवर, पदाधिकारी,संचालक,सभासद,कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.

फोटो : अभिजित पाटील यांचा सत्कार करताना अनिल वीर शेजारी मान्यवर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *