***म्हसवड वृत्तसेवा **अहिंसा पतसंस्थेच्या माध्यमातून म्हसवड मधील सामाजिक कार्यकर्ते राजाभाऊ डोंबे ज्यांनी असंख्य अशा विधवा, निराधार महिला, अपंग यांना न्याय मिळवून देण्याचे फार मोठे कार्य त्यांनी केले. आणि या कार्याचा गौरव म्हणून त्यांचा सत्कार अहिंसा पतसंस्थेचे संचालक,म्हसवड नगरपरिषदेचे विद्यमान नगरसेवक व आरोग्य व स्वछता सभापती विजयशेठ बनगर यांचे शुभहस्ते पार पडला.प्रथमत: नगरसेवक म्हणून निवडून आलेले व सभापती पदी नेमणूक झालेबद्दल संस्थेचे संचालक विजय शेठ बनगर यांचा शाल व भेटवस्तू देऊन संस्थेचे कुटुंबप्रमुख व माजी नगराध्यक्ष नितिन भाई दोशी यांनी केले. व राजाभाऊ डोंबे यांचा सत्कार शाल,भेटवस्तु, व प्रशस्तीपत्र देऊन सभापती विजय शेठ बनगर यांचे हस्ते करण्यात आलाया कार्यक्रम प्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना जेष्ठ पत्रकार आण्णासाहेब टाकणे म्हणाले कि, राजाभाऊ डोंबे यांनी निराधार व विधवा महिला यांचे साठी फार मोठे योगदान दिले आहे. म्हसवड व पंचक्रोशीत त्यांचे कार्याचा ठसा आहे, त्यांनी या सर्वसामान्य लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी अनेक मोर्चे, आंदोलने केली आहेत. राजाभाऊ म्हणजे प्रशासनावर असलेला दबदबा राजाभाऊ म्हणजे निराधारांचा खरा आधार बनले. महाराष्ट्रात कोणीही मदतीसाठी हाक मारुद्यात राजाभाऊ हजर असे निःस्वार्थ व्यक्तिमत्व मी आजपर्यंत पाहिले नाही. तसेच अहिंसा पतसंस्थेचे संचालक व म्हसवड नगरपालिका सभापती विजयशेठ बनगर हे सुद्धा प्रचंड कामाचा माणूस आहे. आणि जनतेने त्यांच्यावर ठेवलेला विश्वास ते नक्कीच सार्थ ठरवतील असेही ते म्हणाले.पुढे अहिंसा पतसंस्थेचे चेअरमन व म्हसवड नगरीचे माजी नगराध्यक्ष आपल्या मनोगतात म्हणाले कि, राजाभाऊ डोंबे म्हणजे निःस्वार्थ लोकांची सेवा करणारे व्यक्तिमत्व हल्लीच त्यांना आदर्श सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार देऊन एका संस्थेने सन्मानित केले होते. खरं तर हा त्यांच्या कार्याचा गौरव होता. त्यांचे कार्य अत्यंत वाखाणण्याजोगे आहे. समाजातील मुख्य पीडित घटक आहे, दुर्लक्षित घटक आहे त्यांना खऱ्या अर्थाने न्याय मिळवून देण्याचे काम राजाभाऊ यांनी केले आहे.ते पुढे म्हणाले कि राजाभाऊ यांनी महाराष्ट्रात सर्वसामान्य लोकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या टोळयांचा पर्दाफाश केला.तसेच विजय शेठ बनगर हे आपल्या अहिंसा परिवाराचा एक भाग आहेत. आणि त्यांनी हल्ली नगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीमध्ये घवघवीत यश संपादन करून त्यांची सभापती नेमणूक झालेबद्दल त्यांचाही गौरव करण्याचा हा कार्यक्रम आयोजित केला आहे. विजयशेठ यांनी त्यांच्या कार्याचा ठसा समाजमनावर उठवावा व लवकरच नगराध्यक्ष पदावर विराजमान व्हावे यासाठी शुभेच्छा दिल्या.अध्यक्षीय भाषणात बोलताना राजाभाऊ डोंबे म्हणाले कि, सामाजिक कार्य करताना घरावर तुळशीपत्र ठेवावे लागते. असंख्य वेळा जेलवारी करावी लागते. समाजात घडणारा अन्याय मला सहन होत नव्हता म्हणून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी कितीही त्रास झाला तरी चालेल पण समाजातील शेवटच्या घटका पर्यंत न्याय मिळाला पाहिजे यासाठी मी नेहमी आग्रही होतो.यानंतर ते म्हणाले, कि बीड, धाराशिव, सातारा सांगली, कोल्हापूर, पुणे महाराष्ट्रातील अनेक भागातील लोकांना न्याय मिळवून दिला आहे. याच कारणामुळे लोकांचं भलं केल्यामुळे आज अनेक अडचणीवर मात करून आपल्यासमोर जिवंत आहे असे ते म्हणाले.का कार्यक्रम प्रसंगी लहुराज चव्हाण, जीवन डोंबे, विशाल शिंदे, संस्थेचे संचालक बाळू सरतापे, धवल व्होरा, संस्थेचे कर्मचारी व अधिकारी तसेच म्हसवड मधील सुजाण नागरिक उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितिन वाडेकर यांनी केले तर आभार नाना मासाळ यांनी मानले. Post navigation स्व. माधवराव (काका) पाटील यांच्या पुण्यतिथी मुरुम शहरात रक्तदान शिबिराने साजरी… “आम्हीच ते कॉक्रोच!” धुळदेव ग्रामसभेत तरुणांचा आक्रमक आवाज