म्हसवड ( दिलीपराज कीर्तने. ) येथील सिद्धनाथ मंदिरातील समाधी मंदिराचा जयंती सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न करण्यात आला.इ.सन दहाव्या शतकातील येथील हेमाडपंथी बांधणीचे हे मंदिर असून या मंदिरात एक गुरव समाजातील मूळ पुरूष,कै. यमाजी गुरव यांचे एक समाधी–मंंदिर बांधलेले आहे.या समाज पुरूषाची व जागृत देवस्थान ची अख्यायिका व सत्यकथा अशी आहे की,मंदिराच्या प्रारंभापासून आज अखेर येथील श्रींची मुख्य आरती सकाळी व रात्री साडे आठला सुरू होते व साडेनऊला संपते.ही आरती करण्याचा मान देवस्थानचे मुख्य पुजारी सालकरी यांचा असतो.दरवर्षी पौष पौर्णिमेला देव पारधीला जातात त्यावेळी तत्कालीन सालकरी कै.यमाजी गुरव हे रात्रीची आरती करीत असताना,गाभाऱ्यातील आरती संपल्यानंतर ते गाभाऱ्यातून बाहेर म्हातारदेवाजवळ पंचारती, धुपारती घेऊन आले,त्याचवेळी त्यांच्या वाईटावर असणाऱ्या विरोधकांनी त्यांच्यावर तलवारीने हल्ला करून त्यांचे माने पासून शीर कापुन टाकले अर्थात धडापासून शीर वेगळे केले. शीर त्याच ठिकाणी पडले आणि महान आश्चर्याची व जागृत देवस्थानची बाब म्हणजे शीर तिथेच पडले तरी केवळ धडाने ( शरीराने ) आरती न सोडता बाहेरील सर्व देवी- देवतांना आरती ओवाळून,संपूर्ण उजवी प्रदक्षिणा घालून शेवटी कै.यमाजींचे धड,शरीर समाधी मंदिराजवळ कोसळले.अशा या निस्सिम भक्ताची व त्याच्या पाठीशी सदैव भक्कम साथ देणाऱ्या देवाची ही सत्यकथा असून त्याचाच जयंती सोहळा आज मोठ्या उत्साहात संपन्न करण्यात आला.हा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न होण्यासाठी तमाम गुरव समाज बांधवांनी सहकार्य करून परिश्रम घेतले. सप्तरंग भजनी मंडळाचा सत्कार करताना सालकारी. 2) कै.यमाजी गुरव यांचा इतिहास सांगताना ह.भ.प.हरिभाऊ गुरव.3 ) समाधी मंदिराची आरती करताना सालकरी- रामचंद्र गुरव,विजय सिन्हा (गुरव), अतुल गुरव,,,, Post navigation जनश्री फाउंडेशन दिनदर्शिकेचे ना.जयकुमार गोरे यांच्या हस्ते प्रकाशन कराड येथे नामदेव समाजोन्नती परिषदेची त्रैमासिक सभा संपन्न