विशेष पुरस्कार वितरण सोहळा

*मुंबई: समाजातील ज्वलंत प्रश्नांना वाचा फोडणाऱ्या आणि निर्भीडपणे सत्य मांडणाऱ्या पत्रकारांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी ‘आर्यारवी एंटरटेनमेंट’ सरसावले आहे. अभिनय, दिग्दर्शन आणि पत्रकारिता क्षेत्रात ३० वर्षांहून अधिक काळ प्रदीर्घ अनुभव असलेले महेश्वर भिकाजी तेटांबे यांच्या संकल्पनेतून ‘पत्रकार व संपादक सन्मान सोहळा २०२६’ चे आयोजन करण्यात आले आहे.या सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे मुख्य प्रवाहातील माध्यमांसोबतच ग्रामीण भागातील मुक्त वार्ताहर, साप्ताहिक व पाक्षिकांचे प्रतिनिधी, डिजिटल न्यूज पोर्टलचे संपादक आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून कार्यरत असलेल्या पत्रकारांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले जाणार आहे.विविध श्रेणींमध्ये पुरस्कारांचे वितरणपत्रकारितेतील निष्ठा, निर्भीडपणा आणि सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या पत्रकारांना खालील मानाच्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येईल:स्वाभिमान लेखणी सन्मान पुरस्कारशब्दवेध गौरव सन्मान पुरस्कारअजेय लेखणी सन्मान पुरस्कारकलम-रत्न सन्मान पुरस्कारनिर्भीड पत्रकारिता सन्मान पुरस्कारनाव नोंदणीचे आवाहनया पुरस्कारांसाठी इच्छुक पत्रकार, संपादक आणि डिजिटल मीडिया प्रतिनिधींनी आपली वैयक्तिक माहिती, कार्याचा संक्षिप्त परिचय आणि छायाचित्र संस्थेकडे पाठवावे, असे आवाहन संस्थापक महेश्वर तेटांबे यांनी केले आहे.महत्त्वाची टीप: पुरस्कार वितरण सोहळ्याची निश्चित तारीख आणि स्थळ याबाबातची अधिकृत माहिती कार्यक्रमाच्या १५ दिवस आधी सर्व संबंधितांना कळविण्यात येणार आहे.संपर्क व अधिक माहितीसाठी

:आर्यारवी एंटरटेनमेंट७/५२, दिग्विजय मिल चाळ, दत्ताराम लाड मार्ग, काळाचौकी, मुंबई- ४०००३३.भ्रमणध्वनी: ९०८२२९३८६७ / ८८७९८१०२९८

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या:
“निर्भया पथकाला बालविवाह रोखण्यात यश; अल्पवयीन मुलीला मिळाले नवजीवन”    |    वडूजच्या विकासासाठी कोट्यवधींचा निधी; सहा महिन्यांत महत्त्वाची विकासकामे मार्गी – नगराध्यक्ष स्वप्नाली गोडसे    |    हिंगणी ग्रामपंचायत कार्यालयाला ग्रामस्थांनी ठोकले टाळे; ग्रामीण मार्ग क्र. १४४ च्या प्रश्नावरून संताप    |    आजचे राशीभविष्य.. 1 जून 2026..    |    म्हसवड येथील नगरवाचनालयात राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची ३०१ वी जयंती उत्साहात साजरी    |    म्हसवड पोलीसांचा दारु भट्टी वर छापा..    |    स्वच्छ बस स्थानक स्पर्धेत म्हसवड पुणे विभागात द्वितीय    |    आपली साथ आणि आशीर्वाद द्या- राजा माने    |    माणदेशी न्यूज - ताज्या घडामोडींसाठी वाचत रहा!