क्रांतिवीर संकुल, उपक्रमशील संकुल – सपोनी संदीप पोमण

 

म्हसवड…प्रतिनिधी
सध्या सर्वत्र स्पर्धेचे युग असून क्रांतिवीर शैक्षणिक संकुल एक उपक्रमशील संकुल असल्याचे प्रतिपादन म्हसवड पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक संदीप पोमण यांनी केले.
क्रांतिवीर शैक्षणिक संकुल म्हसवड मध्ये समर कॅम्प समारोप कार्यक्रम आयोजित केला होता. अध्यक्षस्थानी कृषिरत्न प्रा. विश्वंभर बाबर होते तर प्रमुख पाहुणे म्हणून म्हसवड पोलीस स्टेशनचे सपोनी संदीप पोमण उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना संदीप पोमण म्हणाले शालेय जीवनात बौद्धिक प्रगती बरोबरच खेळातील सहभाग सुद्धा महत्त्वाचा आहे. त्यातून आदर्श व्यक्तिमत्त्वाची जडणघडण होते. शालेय अभ्यासाबरोबरच विविध कौशल्य विषयक गुणांचा सुद्धा याच स्तरावर विकास होणे गरजेचे असते. जय पराजया पेक्षा स्पर्धेतील सहभाग महत्त्वाचा आहे.विविध खेळ स्पर्धेच्या निमित्ताने शिस्त, एकता, अनुशासन , संघटन, सुयोग्य नियोजन तसेच विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक दृष्टिकोनाची सुधारणा होते. शालेय जीवनात वाचनाची आवड जोपासा. जिद्द चिकाटी ठेवा. उच्च ध्येय बाळगा. चांगली संगत ठेवा. विज्ञानवादी रहा. टीव्ही मोबाईल पासून दक्ष रहा. आपल्या आवडीच्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये प्रवेश करून प्रगती साधा. यावेळी ससा आणि कासव या प्राण्यांची विविध ढंगातील व भिन्न प्रवर्गातील गोष्ट सांगून नेहमी दक्ष राहून दुसऱ्याला मागे ठेवण्यासाठी नव्हे तर स्वतःला सिद्ध करण्यासाठी सतर्क राहण्याचे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले.
अल्पावधीत क्रांतिवीर शैक्षणिक संकुलाने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबवलेल्या विविध उपक्रमाचे संदीप पोमण यांनी कौतुक केले. क्रांतिवीर संकुल एक उपक्रमशील संकुल असून संस्थेने आपल्या सर्वोत्कृष्ट दर्जातून सिद्ध केल्याचेही सांगितले. संस्थेवरील पालकाचा विश्वास तसेच शिक्षकांचे कष्ट महत्त्वाचे आहे. क्रांतिवीर शैक्षणिक संकुलाला उज्वल भविष्य असल्याचे सांगून कृषिरत्न विश्वंभर बाबर व आदर्श मुख्याध्यापिका सुलोचना बाबर यांच्या सामाजिक व शैक्षणिक गौरवशाली उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले. ए. आय. व संगणक शिक्षण प्रणाली बद्दल पोमण यांनी मार्गदर्शन केले. समर कॅम्प मधील यशस्वी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व मेडल देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी बोलताना कृषिरत्न विश्वंभर बाबर म्हणाले खेळातून भारतरत्न सचिन तेंडुलकर तसेच माणदेशी सुकन्या ऑलिम्पिक पटू ललिता बाबर यांच्यासह अनेक मान्यवर घडल्याचे सांगितले . प्रास्ताविक मुख्याध्यापिका सुलोचना बाबर यांनी केले व संस्थेच्या प्रगतीचा तपशील तसेच समर कॅम्प आयोजनाचा उद्देश याबाबतची माहिती उपस्थितांना दिली.
यावेळी प्राचार्य विन्सेंट जॉन , समन्वयक अभिजीत सावंत, संकुलातील शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तुकाराम घाडगे यांनी केले तर उपस्थितांचे आभार क्रीडा शिक्षक चंद्रकांत तोरणे यांनी व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या:
“निर्भया पथकाला बालविवाह रोखण्यात यश; अल्पवयीन मुलीला मिळाले नवजीवन”    |    वडूजच्या विकासासाठी कोट्यवधींचा निधी; सहा महिन्यांत महत्त्वाची विकासकामे मार्गी – नगराध्यक्ष स्वप्नाली गोडसे    |    हिंगणी ग्रामपंचायत कार्यालयाला ग्रामस्थांनी ठोकले टाळे; ग्रामीण मार्ग क्र. १४४ च्या प्रश्नावरून संताप    |    आजचे राशीभविष्य.. 1 जून 2026..    |    म्हसवड येथील नगरवाचनालयात राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची ३०१ वी जयंती उत्साहात साजरी    |    म्हसवड पोलीसांचा दारु भट्टी वर छापा..    |    स्वच्छ बस स्थानक स्पर्धेत म्हसवड पुणे विभागात द्वितीय    |    आपली साथ आणि आशीर्वाद द्या- राजा माने    |    माणदेशी न्यूज - ताज्या घडामोडींसाठी वाचत रहा!