मायणी प्रतिनिधी–

वृत्तसेवा (फोटो – कलेढोण मधील जोरदार पावसाचे दृश्य) कलेढोण व विखळे परिसरात दुपारी १पासून वादळी वाऱ्यासह जोरदार पर्जन्य वृष्टी झाली. कलेढोणच्या रस्त्यांनी पाणी वाहत होते. मध्यंतरी विजा पडत होत्या. या भागात अखंडपणे एक वाजल्यापासून पाऊस पडत आहे. जवळजवळ २ तास होऊन गेले तरी पावसाचा जोर कमी होत नव्हता.ढगांचा गडगडाट होत होता.या पावसाने हवेत गारवा निर्माण झाला. जोरदार पावसाने हजेरी लावल्याने उन्हाळा आहे की पावसाळा आहे हेच कळेनासे झाले.उद्यापासून हनुमान यात्रेला सुरुवात होणार आहे. या पावसाने सर्वच चित्र बदलून गेले आहे.पावसामुळे यात्रेचा उत्साह कमी होईल की काय अशी परिस्थिती निर्माण होत आहे. रस्त्यावरून व नाल्यातून पाणी ओसंडून वाहत होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *