म्हसवड: प्रतिनिधी
सातारा-पंढरपूर मार्गावरील धुळदेव परिसरात वारंवार होणाऱ्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर संबंधित ठेकेदार व अधिकारी यांचेवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अन्यथा 1 एप्रिल रोजी म्हसवड पोलीस ठाण्यासमोर पत्रकारांनीआमरण उपोषणाचा इशारा दिला आहे. याबाबतचे निवेदनाद्वारे दिला आहे.

माण तालुक्यातील धुळदेव परिसरात नुकताच झालेल्या भीषण अपघातात दोन निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाल्याने परिसरात संतापाची लाट उसळली आहे. या मार्गावरील म्हसवड-माणनदी पूल, दिवड-करंज ओढा पूल, धुळदेव ओढा पूल आदी कामे गेल्या आठ वर्षांपासून अपूर्ण असल्याने अपघातांचे प्रमाण वाढले असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

पत्रकारांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, संबंधित विभाग, ठेकेदार आणि प्रशासन यांना वारंवार पत्रव्यवहार करूनही कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आलेली नाही. या निष्काळजीपणामुळे आतापर्यंत 30 हून अधिक नागरिकांचा बळी गेला असल्याने या घटना केवळ अपघात नसून गंभीर निष्काळजीपणाचे परिणाम असल्याचे स्पष्ट होते.

यासंदर्भात पत्रकारांनी खालील प्रमुख मागण्या केल्या आहेतः

संबंधित ठेकेदार व बांधकाम कंपनीवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा.प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अपूर्ण रस्ते व पुलांची कामे तात्काळ पूर्ण करावीत भविष्यातील अपघात टाळण्यासाठी तातडीच्या उपाययोजना कराव्यात

दरम्यान, या मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास 1 एप्रिल रोजी म्हसवड पोलीस स्टेशनसमोर पत्रकार अमरण उपोषणास बसणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे.
अपूर्ण रस्ते व पुलांची कामे तात्काळ पूर्ण करावीत भविष्यातील अपघात टाळण्यासाठी तातडीच्या उपाययोजना कराव्यात

दरम्यान, या मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास 1 एप्रिल रोजी म्हसवड पोलीस स्टेशनसमोर पत्रकार अमरण उपोषणास बसणार असल्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

या निवेदनावर सल्लाउद्दिन चोपदार , पोपट बनसोडे सचिन शिंगाडे शहाजी लोखंडे अहमद मुल्ला विजय टाकणे, विजय भागवत यांच्या सह्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या:
“निर्भया पथकाला बालविवाह रोखण्यात यश; अल्पवयीन मुलीला मिळाले नवजीवन”    |    वडूजच्या विकासासाठी कोट्यवधींचा निधी; सहा महिन्यांत महत्त्वाची विकासकामे मार्गी – नगराध्यक्ष स्वप्नाली गोडसे    |    हिंगणी ग्रामपंचायत कार्यालयाला ग्रामस्थांनी ठोकले टाळे; ग्रामीण मार्ग क्र. १४४ च्या प्रश्नावरून संताप    |    आजचे राशीभविष्य.. 1 जून 2026..    |    म्हसवड येथील नगरवाचनालयात राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची ३०१ वी जयंती उत्साहात साजरी    |    म्हसवड पोलीसांचा दारु भट्टी वर छापा..    |    स्वच्छ बस स्थानक स्पर्धेत म्हसवड पुणे विभागात द्वितीय    |    आपली साथ आणि आशीर्वाद द्या- राजा माने    |    माणदेशी न्यूज - ताज्या घडामोडींसाठी वाचत रहा!