म्हसवड दि. २१– सिध्दनाथाच्या नावानं चांगभल च्याजयघोषात मानकऱ्यांच्या व भाविकांच्या उपस्थितीत म्हसवड येथील श्री सिध्दनाथ व माता जोगेश्वरीचा रथ जाड दोरखंडाच्यासाह्याने रथगृहातून बाहेर काढून तोमिरवणुकीसाठी सज्ज करण्यात आला.दीपावली पाडव्यास पारंपारिकपध्दतीने श्री सिध्दनाथ माता जोगेश्वरीचा शाही विवाह सोहळा उत्सवाचा प्रारंभझाला. श्रींच्या उत्सव मुर्तीींना हळदीलावणे, त्यानंतर तुलशी विवाहच्यामध्यरात्री विवाह सोहळा व विवाहानंतर होणा-या देवदिवाळीस वधु-वराची वरात म्हणेजच रथ मिरवणुकीने या शाही विवाह सोहळ्याची सांगता होणारआहे. या रथोत्ससवासाठी गेली वर्षषभर रथगृहात बंद असलेला श्रींचा रथ हा आज कार्तिक एकादशी दिवशी रथगृहातून बाहेर काढण्यात आलारिंगावण पेठ मैदानातून विराजमानझालेला श्रींचा रथाची संपुर्ण नगरप्रदक्षिणा केली जाते. हा रथ भाविक जाड दोरखंडाच्या साह्याने श्रींचा रथ हाताने ओढीत मार्गस्थ करतात. यावेळी भाविक गुलाल-खोबऱ्याची उधळण करतअसतात. या रथोत्सवाच्या आदल्यादिवशी आमावस्येला रथाचे कळस वमानाची वस्त्रे रथावर चढवली जातात व रथोत्सवाच्या दिवशी सकाळी श्रींचा नैवद्य व सिंहासन हे राजेमाने मानकऱ्यांच्याराजवाड्यातून मंदिरात जाते व तेथूनच ते सिंहासन व नैवद्य यात्रा पटांगणावरील रथामध्ये नेला जातो व मानकऱ्यांच्याउपस्थितीत मंदिरातून श्रींच्या उत्सवमूर्ती पालखीतून रथापर्यंत नेल्या जातात.पालखी रथाजवळ आल्यानंतर मानकरी राजेमाने यांच्या उपस्थितीतच श्रींच्या उत्सव मूर्ती रथामध्ये विराजमान केल्या जातात व परंपरेनुसार या रथामधील श्री सिध्दनाथ व माता जोगेश्वरी यांच्या मुर्तीचे पुजन करून रथाचे पुजन करून रथमार्गस्त करून रथोत्सवास प्रारंभ होतो.यावेळी सालकरी रामचंद्र व्हंकारे ( गुरव) मठाधिपती रविनाथ महाराज, रथाचे मानकरी श्रीमंत अजितराव राजेमाने, श्रीमंत गणपतराव राजेमाने, श्रीमंत प्रतापसिंह राजेमाने, श्रीमंत पृथ्वीराज राजेमाने, श्रीमंत तेजसिंह राजेमाने, श्रीमंत दिपसिंह राजेमाने, श्रीमंत विश्वजित राजेमाने, श्रीमंत सयाजीराजे राजेमाने आदी मानकरी माळी, लोहार, सुतार, व बारा बलुतेदार मानकरी उपस्थित होते. Post navigation लाडकी बहिण योजना केवायसी मुदत 31 डिसेंबर पर्यंत.